तांत्रिक बाबाच्या हातापायांत 11 खिळे ठोकले.. 'त्या' कारणावरून भयंकर संपवलं

मुंबई तक

• 08:01 PM • 30 May 2026

crime news : तांत्रिक परदेशी बाबाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी हत्येचा छडा लावत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या माहितीनुसार, हल्ल्यात वापरलेले धारदार शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तांत्रिक बाबाची भयंकर हत्या

point

दोन महिन्यांपासून हत्येचा कट

point

मृताच्या हातापायांत 11 खिळे ठोकले

Crime News : उत्तर प्रदेशातील सीतापूरच्या संदाना पोलीस ठाणे परिसरात 13 मे रोजी तांत्रिक परदेशी बाब यांच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी हत्येचा छडा लावत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या माहितीनुसार, हल्ल्यात वापरलेले धारदार शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत. या घटनेनं संबंधित परिसर हादरून गेला आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून चेष्टा

प्रकरण काय समजून घ्या 

एएसपी दुर्दैश सिंग आणि सीओ मिस्त्रीख ब्रिजेश कुमार यांच्या देखरेखीखाली कारवाई करत, संदाना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी नागेंद्रला मलिहाबाद येथून अटक केली. नागेंद्र हा लखनऊ जिल्ह्यातील मलिहाबाद पोलीस ठाणे परिसरात नवीनगरचा रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 13 मे 2026 रोजी संदाना परिसरातील नदीकाठाजवळच्या जंगलातून मृतदेह आढळला होता. संबंधित मृतदेहाची ओळख सत्यनारायण यादव उर्फ परदेशी बाबा अशी ओळख पटली. या प्रकरणी संदाना पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दोन महिन्यांपासून हत्येचा कट

चौकशीदरम्यान आरोपी नागेंद्रने सांगितलं की, परदेशी बाबा गेल्या 17-18 वर्षांपासून त्याच्या आईवर उपचार करत होते. बाबांनी काळ्या जादूच्या प्रभावाखाली आरोपीच्या आईला अडकवून ठेवल्याचा संशय आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी याच मुद्द्यावरून त्याचा बाबांशी वाद झाला होता. आरोपीच्या म्हणण्यांनुसार, तो गेल्या दोन महिन्यांपासून हत्येचा कट रचत होता. या घटनेच्याच दिवशी, महिलेवर उपचार करून पैसे देण्याच्या उद्देशाने बाबांना दुचाकीवरून जंगलात बोलावले, तिथे त्याने चाकूने सपासप वार केले आणि गळा चिरून हत्या केली. 

हे ही वाचा : मुलाने शेतात शौच केल्याने आईला रॉडने बेदम मारहाण, नंतर ग्रामस्थांकडून दगडफेक

मृताच्या हातापायांत 11 खिळे ठोकले

दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित हत्येनंतर आरोपीने मृताच्या हातापायांत 11 खिळे ठोकले, जेणेकरून मांत्रिकाचा आत्मा भटकणार नाही, असा त्यांचा याबाबतीत विश्वास होता. संबंधित हत्येसाठी वापरण्यात आलेले चाकू तसेच इतर साहित्य घटनास्थळावरून जप्त केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने कपडे, बुट, हातमोजे आणि इतर वस्तू जाळल्याचे कबुल केले होते.