मुलीच्या प्रकरणावरून मुलाला उलटं टागलं, नंतर गळा चिरून केली हत्या, अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कांड

Crime News : मुलीच्या प्रकरणावरून मुलाने आपल्याच मित्राला उलटे लटकवून केली हत्या, धक्कादायक प्रकरण आलं समोर.

crime news

crime news

मुंबई तक

• 03:49 PM • 04 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मित्राने मुलाला उलटं लटकवून खून केला

point

मुलाला मारण्यासाठी PUBG गेमची पद्धत वापरून मित्राचीच हत्या

Crime News : बिहारच्या कटीहार जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. एका मुलीसाठी मित्राची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं अहमदाबाद परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलगा अल्पवयीन होता असल्याची माहिती समोर आली. या हत्येप्रकरणात पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका मुलाला अटक करून बालसुधारगृहात पाठवण्यात आले. मृत आणि आरोपी हे सर्व पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी प्रथम त्याला उलटे लटकवले, नंतर त्याचा गळाच चिरत खून केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गुंडांनी गाडी आडवत शिक्षिकेच्या कपाळातच गोळी घालत संपवलं, शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात, हादरवणारं प्रकरण

हत्येमागील कारण एक मुलगी आणि  PUBG गेम

पोलीस ठाण्याचे ऑफिसर इन्स्पेक्टर कुंदन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येमागील कारण एक मुलगी आणि  PUBG गेम आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलाला मारण्यासाठी PUBG गेमची पद्धत वापरून मित्राचीच हत्या करण्यात आली. या तपासातून असे दिसून आले की, मुलाला उलटे लटकवण्यात आले आणि नंतर गळ्यावर वार करण्यात आले. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीवर फेकण्यात आला. 

अल्पवयीन आरोपींना अटक

फॉरेन्सिक पथकाने मदतीने पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणाची तपासणी करण्यात आली. शवविच्छेदनाच्या एकूण अहवालानुसार, हा गुन्हा अगदी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. स्टेशन प्रभारी म्हणाले की, सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत आणि इतर अल्पवयीन आरोपींना अटक करण्यासाठी छापे देखील टाकण्यात आले होते. 

हे ही वाचा : पाच मुलांच्या आईचा भंगारवाल्यावर जीव जडला, नवऱ्यासमोरच उरकला विवाह, पहिला नवरा म्हणाला...

मृताच्या कुटुंबाने दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेल्या व्यक्तीची तक्रार दाखल करण्यात आली होती. अशातच, अहमदाबादमध्ये एका विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांनीही तपास केला आणि आरोपींना अटक केली आहे. 

    follow whatsapp