बॉयफ्रेंड पोहचला गर्लफ्रेंडच्या घरी, थेट मृतदेहच आला घरी; काय घडलं ते तुम्हीच पाहा!

Crime news : पटना येथील पालागंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. तरुणाचे नाव सोनू कुमार (वय 20) असे आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:00 AM • 15 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाला प्रेयसीच्या घरी बोलावून मारहाण

point

नेमकं काय घडलं?

Crime News : पटना येथील पालागंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाची प्रेमप्रकरणातूनच हत्या झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तरुणाचे नाव सोनू कुमार (वय 20) असे आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेनंतर तरुणीचे कुटुंबीय घर सोडून निघून गेले आहेत. पोलीस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पांडुरंगा... वारकऱ्यांच्या दिंडीत थेट कंटेनर शिरला, मुंबई-पुणे महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू

नेमकं काय घडलं? 

संबंधित प्रकरणात एसडीपीओ पालीगंजने सांगितलं की, सोमवारी सकाळी इजरता गावातील मांझी टोला येथे काही लोक एका तरुणाला बेदम मारहाण करत होते. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाला गावकऱ्यांनी वाचवले आणि उपचारासाठी पीएचसी पालीगंज येथे रुग्णालयात पाठवले. प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांनी त्याला नंतर पीएमसीएच येथे जाण्यास सांगितले होते. दरम्यान, तरुणाचा पाटणा येथेच जाताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. 

हे ही वाचा : बोरिवलीतील सुधीर फडके पुलाखाली नराधमानं महिलेला ओढून नेलं, नंतर तिचं लैंगिक शोषण करत... चीड आणणारा प्रकार

संबंधित प्रकरणात डीएसपी-1 राजीव चंद्र सिंह यांच्या मते, रविवारी रात्री उशिरापणे हा तरुण गावातील एका घरातच प्रवेश केला होता. तेव्हा घरातील लोकांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि नंतर बेदम मारहाण केली. तसेच डीएसपी-1 यांनी सांगितलं की, हे प्रेम प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp