महिलेचं बाहेर प्रेमप्रकरण, प्रियकराने घरात घुसून तिच्यासमोर नवऱ्याचा केला खून, हादरवून टाकणारं कांड...

Crime News : अनैतिक संबंध आणि विवाहाशी संबंधित प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रियकराने आपल्याच प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकराण उघडकीस आलं आहे.

crime news

crime news

मुंबई तक

24 Nov 2025 (अपडेटेड: 24 Nov 2025, 08:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधातून खून

point

एकूण प्रकरण काय? 

Crime News : उत्तर प्रदेशातील बागपातच्या शहर कोतवाली भागातील कोतीपुरा परिसरात एक भयानक घटना घडली आहे.  हे प्रकरण अनैतिक संबंध आणि विवाहाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. बागपत येथील रहिवासी रियासतचा विवाह सैनसोबत झाला होता. सैनच्या आयुष्यात आधीच एक पुरुष होता, ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करत होती, त्याचं नाव समीर असे आहे. रियासतसोबत लग्न झाल्यानंतर तिचे अनेक काळ समीरसोबत प्रेमसंबंध सुरु होते. सैनचा पती रियासतला याबाबतची माहिती मिळाली होती. नंतर त्याने वारंवार विरोध केला. अशातच समीरने पत्नी सैनसमोर पती रियासतची हत्या केली.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा होणार?

एकूण प्रकरण काय? 

मिळालेल्या वृत्तानुसार, आरोपी समीरने याआधी रियासतला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. तसेच रात्री तो आपली प्रेयसी सैनला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हाच सैनचा पती रियासत आणि प्रियकर समीर या दोघांमध्ये मोठा वाद उफळला. रियासतने इथं का आला आहे, असा जाब विचारला होता. त्यानं घरी येऊ नये असे समीरला सांगितले. 

या शा‍ब्दिक वादाचे मारहाणीत रुपांतर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  त्यानंतर समीरने रियासतवर वारंवार वार केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला, मृत रियासतचा भाऊ अबलूचा आरोप आहे की सैनने समीरसह त्याच्यावरही चाकूने हल्ला केला होता. 

हे ही वाचा : जालन्यात दिवसाढवळ्या माजी सरपंचाला तलवारीने सपासप वार करत संपवलं, चेहरा देखील ओळखू येईना..

पोलिसांचा तपास सुरु 

पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठवला होता. बागपत पोलिसांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले की या प्रकरणात पुरावे गोळा केले जात आहेत आणि गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असं सांगितलं. 

    follow whatsapp