Crime News : मध्य प्रदेशातील सिवानी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कुराई पोलीस ठाणे परिसरात सुकात्रा-बदलपार रस्त्यावरील हवाईपट्टीजवळ असलेल्या शांती वन रिसॉर्टवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, रिसॉर्ट चालकाच्या मुलासह तिघांना ताब्यात घेतले. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर केलेल्या एकूण तपासात एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याचं गंभीर प्रकरण उघडकीस आलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लहानग्यांच्या अश्लील व्हिडिओची 300 रुपयांना विक्री, CID कडून मोठा पर्दाफाश
मित्रासह तरुणाने अल्पवयीन मुलीला रिसॉर्टवर बोलवून...
पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरातील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून रिसॉर्टबाबत तक्रार केली होती. वारंवार आलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकत उपस्थितांची चौकशी केली होती. तपासात असे उघडकीस आले की, रिसॉर्ट मालकाचा मुलगा अंकित सनोडिया (वय 23) हा डुंडशिवानी येथील रहिवासी होता. तो आपल्या दोन मित्रांसह 17 वर्षे 11 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला रिसॉर्टवर बोलवायचा. या प्रकरणादरम्यान सांगण्यात येतंय की, 15 ते 16 मे दरम्यान तिला रिसॉर्टवर बोलावले.
रिसॉर्टवर मोठा राडा
याचदरम्यान, नागरिक रिसॉर्टवर पोहोचले, तिथे मोठा दंगा झाला आणि प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनलं. या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं. अशा परिस्थितीत उपस्थित असलेल्या काही इतर लोकांचा देखील तपास करण्यात आला. बरघाट एसडीओपी ललित गठरे यांनी सांगितलं, आरोपींविरोधात बीएनएस कलमांन्वये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा विस्तृत तपास करत आहे.
हे ही वाचा : झोपेतून उठलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला, पुणे हादरले, नेमकं प्रकरण काय?
अशातच आता पोलीस प्रशासन रिसॉर्टविरोधातही कठोर पाऊल उचलणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी तहसीलदारास पत्र पाठवून रिसॉर्ट सील करण्यास सांगितले.
ADVERTISEMENT











