रुग्णालयात तरुणीवर सुरू होते उपचार, शौचालयासाठी उठली अन् रुग्णाने तिला खोलीत नेलं...

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 07:49 PM)

Crime News : दिल्लीतील एका जग प्रवेश चंद्र रुग्णालयात 23 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. तरुणीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयाच्या मिनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी तिच्यावर लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जग प्रवेश चंद्र रुग्णालयात 23 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

point

दिल्ली पुन्हा हादरली

Crime News : दिल्लीतील जग प्रवेश चंद्र रुग्णालयात 23 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. तरुणीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयाच्या मिनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्रीच्या सुमारास ती उशिरा रुग्णालयातील शौचालयात जाण्यासाठी बाहेर पडली, तेव्हा दुसऱ्या रुग्णाने तिला ओपीडी विभागात नेले आणि त्याच ठिकाणी तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. या घटनेनं दिल्ली पुन्हा हादरून गेली आहे. यामुळेच दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 29 जूनपासून लक्ष्मी राजयोगाची सुरुवात, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य चमकेल

नेमकं काय घडलं? 

सोमवारी पहाटे तरुणी ही अस्वस्थ दिसत होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत रुग्णालयातील आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, पीडित मुलगी शनिवारी सोनिया विहार परिसरात आढळली. त्यावेळी तिची प्रकृती बिघडलेली होती. ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे दिसून येत होतं. 

पोलिसांनी मुलाला जेपीसी रुग्णालायत नेले असता, तिच्यावर मिनी आयसीयूत उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतरच तरुणीचं लैंगिक शोषण करण्यात आलं. सोमवारी सकाळी न्यू उस्मानपूर पोलिसांशी संपर्क साधत विनयभंगाची तक्रार दाखल केली. तपासानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

हेही वाचा : "लय घाण बोलेन...", म्हणत कानाखाली मारली, महिला पोलिसाची ट्रिपल सिट स्कुटी पळवणाऱ्या मुलींना शिवीगाळ

रुग्णालय प्रशासन मूग गिळून गप्प

रुग्णालय प्रशासन या प्रकरणात मूग गिळून गप्प आहे. तसेच काही रहिवाशांना या घटनेचा तीव्र विरोध केला आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणात आरोपीची चौकशी करत आहेत. मात्र, रुग्णालय प्रशासन काहीही एक बोलत नाहीत.