Crime News : छत्तीसगडच्या रायपूर येथील सरोरा परिसरात कौटुंबिक वादातून सततच्या टोमण्याने प्रकरणाला खूनाचं रूप आलं. मागील तीन वर्षांपासून पत्नी आणि एक मुलगा तसेच नवरा घर जावई म्हणून राहत होता. त्याला घर जावई म्हणून अनेकदा टोमणा दिला जायचा, हाच टोमणा त्याच्या जिव्हारी लागला. अशातच त्याने आपल्याच मेहुण्याची हत्या केली. हत्या केलेल्या घर जावयाचं नाव प्रकाश असे आहे. तसेच हत्या करण्यात आलेल्या मेहुण्याचे नाव गिरीधर साहू असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश, 'या' राशींवर संकटाची टांगती तलवार, 12 राशींचं जाणून घ्या भविष्य
घर जावई बोलणं दाजीच्या जिव्हारी लागलं
मेहुणा गिरीधर आपला दाजी प्रकाशला घर जावई बोलायचा. मेहुण्याचे हेच बोलणं प्रकाशच्या जिव्हारी लागलं. बुधवारी त्यांच्यात यावरूनच मोठा वाद झाला होता. रात्री वाद इतका वाढला की, ज्यात प्रकाशने गिरीधरचा खून केला.
मेहुण्याला दारू पाजून दाजीनं घेतला जीव
दरम्यान, आरोपी प्रकाशने त्याचा मेहुणा, गिरीधरला रिंग रोड क्रमांक 2 वरील एका दारूच्या दुकानात नेले होते. तिथे त्याला दारू देखील पाजली होती. नंतर त्याला सरोन टर्न येथे नेले आणि पुन्हा दारू पाजली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गिरीधरवर प्रकाशने चाकूने हल्ला करत संपवलं.
हे ही वाचा : शाळकरी मुलाच्या रफ वहीने उलगडले हत्येचे गुपित, रील स्टारचे दोन प्रियकर अन् मोठं कांड
हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, गिरीधरचा जागीच मृत्यू झाला. आश्चर्याची बाब अशी की, गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी प्रकाशने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, याउलट त्याने 112 वर फोन करून पोलिसांना आपल्या ठिकाणाची माहिती दिली आणि आत्मसमर्पण देखील केले. पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला, आरोपीला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT











