बायकोनं दारूत विष मिसळून नवऱ्याला संपवलं, त्यावरच लिहिलं पुस्तक

Crime News : महिलेनं दारूमध्ये विष मिसळून आपल्याच पतीची हत्या केली. नंतर त्यावरच पुस्तक लिहिलं आणि सहानुभूती मिळवली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांना अनेकदा त्रास देखील झाला होता. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर चार वर्षानंतर न्यायालयाने महिलेला दोषी पकडलं.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:10 PM • 14 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

हिलेनं दारूमध्ये विष मिसळून आपल्याच पतीची हत्या केली

point

मुलांनी ओढावलेल्या संकटाविषयी सांगितलं भयंकर

Crime News : अमेरिका येथील यूटामध्ये महिलेनं दारूमध्ये विष मिसळून आपल्याच पतीची हत्या केली. नंतर त्यावरच पुस्तक लिहिलं आणि सहानुभूती मिळवली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांना अनेकदा त्रास देखील झाला होता. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर चार वर्षानंतर न्यायालयाने महिलेला दोषी पकडण्यात आलं होतं. अशातच मुलांनी याबाबत सांगितलं की, त्यांची आई जेव्हा कधी तुरुंगातून बाहेर पडते तेव्हा त्यांना असुरक्षित वाटत नाही.  अमेरिकेच्या न्यायालयाने बुधवारी महिलेला जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, तसेच ती पॅरोलवर देखील बाहेर पडू शकत नाही. संबंधित प्रकरणातील आरोपीची ओळख कूरी रिचन्सि (वय 35) आणि मृत नवऱ्याची रिचिन्स अशी ओळख समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : त्याच्यासाठी बॉयफ्रेंडचा खून, सविता निघाली मास्टरमाइंड; हादरवणारं प्रेम

नेमकं काय घडलं? 

2022 मध्ये कूरीने आपल्या पतीच्या दारूमध्ये विष मिसळलं होतं. कूरीला फसवणूक, धोका, विमा फसवणूक आणि हत्येचा प्रयत्न यासह इतर चार गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. कूरी रिचन्सने यापूर्वी देखील तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार, व्हेलेंटाईन डेच्या काही आठवड्यांपूर्वी तिने एरिकला फेंटॅनिल मिसळलेले सँडविच घाऊ घालून विष देण्याचा प्रयत्न केला होता. 

कौरीवर लाखो डॉलर्जचे कर्ज

सँडविच खाल्यानंतर एरिकची प्रकृती बिघडली होती, पण तो वाचला होता. शिक्षा सुनावताना न्यायाधीश रिचर्ड माराझी म्हणाले, असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला असंच मोकळं सोडता कामा नये, योग असा की, शिक्षा सुनावणीच्या दिवशी एरिक रिचन्सचा 44 व्या दिवशी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, कौरीवर लाखो डॉलर्जचे कर्ज होते आणि ती दुसऱ्या पुरुषासोबत भविष्याचं प्लानिंग केलं होतं. 
 
तिने पतीच्या नकळत अनेक आयुर्विमा पॉलिसी काढल्या होत्या आणि ती दुसऱ्या पुरुषासोबत भविष्याची योजना आखत होती. तिने आपल्या पतीच्या नकळत आयुर्विमा पॉलिसी काढल्या होत्या आणि नंतर तिचा विश्वास होता की, त्याच्या मृत्यूनंतर तिला 4 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिकची संपत्ती मिळेल. या प्रकरणाने संपूर्ण अमेरिकेत एकच खळबळ उडाली. 

तिला अटक होण्यापूर्वी कौरीने एका पुस्तकात प्रचार केला होता, ज्यात मुलाच्या वडिलांना गमावण्याचे दुःख त्यात नमूद केलं होतं. एरिक रिचन्सचे वडील, युजीन रिचन्स यांनी नातवंडांच्या संरक्षणासाठी कौरीला पॅरोलशिवाज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. वडिलांच्या मृत्यूवेळी कौरीची मुलं वय वर्षे नऊ, सात आणि पाच वर्षांचे होते. 

हे ही वाचा : सांगली: 9 महिन्यांचा चिमुकला पाळण्यात झोपी गेला, वादळी वारा आला अन्...

मुलांनी ओढावलेल्या संकटाविषयी सांगितलं भयंकर

सुनावणीदरम्यान, तिच्या तीन मुलांचे जबाब वाचून दाखवण्यात आले होते. मुलांनी सांगितलं की, आई कधीपासून तुरुंगातून बाहेर आली, की त्यांना सुरक्षित वाटणार नाही. एक मुलगा म्हणाला की, तू लोभापोटी आमचे वडील आमच्यापासून हिरावून घेतलेस. मुलांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी अर्धवट शिजवेले अन्न खाण्यास नकार दिला असता, तेव्हा रिचेन्सने त्यांच्या पाळीव प्राण्यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली. युद्धग्रस्त भागांतील उपाशी असलेल्या मुलांचे व्हिडिओ दाखवले. अशातच तिच्या थोरल्या मुलाने याबाबत सांगितलं की, त्याची आई नशेत असताना जवळजवळ दररोज एकाच खोलीत कोंडून ठेवायची. दरम्यान कोरीच्या मोबाईल फोनमधील संदेश आणि इंटरनेटची शोध नोंदी सादर केल्या, ज्यात फेंटॅनिलच्या प्राणघातक डोसमधझील केलेले शोध आणि विषप्रयोगाद्वारे हत्येशी संबंधित प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. कोरीने सातत्याने आपण कसे निर्दोष आहोत याचा दावा केला होता.