त्याच्यासाठी बॉयफ्रेंडचा खून, सविता निघाली मास्टरमाइंड; हादरवणारं प्रेम

crime news : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तरुणाच्या हत्याकांडाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यात पोलिसांनी मृत व्यक्तीची कथित प्रेयसी आणि होणारी वधू, सविता लिल्हाेरेला देखील अटक केली. एवढंच नाही,तर दोन अल्पवयीन भाच्यांना देखील बालसुधाहरगृहात पाठवण्यात आले. या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली होती. 

crime news

crime news

मुंबई तक

• 07:02 PM • 14 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाचे आणि तरुणीचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध 

point

दोन भाच्यांनी मिळून मृतदेह दुचाकीवरून रस्त्याच्या ठिकाणी फेकला

Crime News : सहा वर्षाच्या प्रेमाचा शेवट इतका भीषण होईल हे विचार न करण्यासारखेच आहे. तरुणीला आपलंसं करण्यासाठी तरुण लिल्हारे कोणताही अडथळ्याचा सामना करण्यास तयार होता, त्याच लग्नाच्या रात्री त्याच्या मृत्यूचा सापळा रचण्यात आला होता. बालाघाट जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तरुणाच्या हत्याकांडाचेच हृदयद्रावक कट रचल्याचं प्रकरण समोर आलं. पोलिसांनी मृताची कथित प्रेयसी आणि होणारी वधू, सविता लिल्हाररेला देखील अटक केली आहे. एवढंच नाही,तर दोन अल्पवयीन भाच्यांना देखील बालसुधाहरगृहात पाठवण्यात आले. या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सांगली: 9 महिन्यांचा चिमुकला पाळण्यात झोपी गेला, वादळी वारा आला अन्...

तरुणाचे आणि तरुणीचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध 

या प्रकरणातील तरुण लिल्हारे (वय 33) आणि सविता लिल्हारे हे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, कुटुंबाच्या संमती अभावी सविताचा विवाह दुसऱ्याच तरुणाशी झाला होता. 5 मे रोजी रात्री घरी लग्नाचे विधी सुरु होते, याचदरम्यान सविता लिल्हारे तरुणाशी फोनवरून सतत बोलत होती. सविताने तरुणाला लग्नसमारंभासाठी आमंत्रित केले आणि तिच्यासोबत पळून जाण्यास सांगितले. प्रेमात अकंठ बुडालेला तरुण रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर आला. त्याला याबाबत कसलीही कल्पना नव्हती, ज्या प्रेयसीला तो भेटण्यास गेला, तेच त्याचं भेटण्याचं अंतिम ठिकाण ठरलं. 

लग्नसोहळ्यात तरुण लिलहारे अन् थोड्याच वेळात मृत्यू

तरुण लग्नाच्या ठिकाणी पोहोचताच वधूच्या भावांनी त्याला पाहिले. त्यांच्यात वाद झाला आणि तरुणाला लग्नाच्या ठिकाणाहून दूर नेण्यात आले. तिथे त्याला लाठी काठीने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब अशी की, या हत्येनंतर लग्नाचे विधी सुरु राहिले होते. तरुणाचा मृतदेह हा दूरवरील अंतरावर आढळून आला होता. प्रकरण शांत झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखण्यात आली. 

दोन भाच्यांनी मिळून मृतदेह दुचाकीवरून रस्त्याच्या ठिकाणी फेकला

संबंधित प्रकरणात पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले, सविताच्या दोन भाच्यांनी मिळून तिचा मृतदेह एका दुचाकीवरून ठेवून गर्राबोडी-मुरझाड रस्त्यावर फेकून दिला होता. नंतर मृतदेह कपडे काढून तो एक अपघात असल्याचा बनाव रचला, परंतु पोलिसांचा तपास आणि शवविच्छेदन अहवालातून हे प्रकरण समोर आले. 

हे ही वाचा : ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिला बसमध्ये ओढले अन् नको तेच.. लाज आणणारी घटना

8 मे रोजी रामपाली पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत सविताचे भाऊ वेदप्रकाश आणि हरिप्रकाश लिल्हारे, चुलत भाऊ दिली आणि कमल किशोर लिलहारे आणि शेजारी असलेले योगेश वरकडे यांना अटक करण्यात आली. 12 मे रोजी या कटातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या मसविता लिल्हारे हिला अटक केली. हे प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरू लागलं आहे.