Crime News : बिहारच्या पाटणातील बेधना गावात दारूत विषारी पदार्थ मिसळून ती दारू तरुणांना पाजल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चार तरुणांच्या मृत्यूमागील खरे रहस्य आता उलगडले असल्याचे हिंदुस्थान या वृत्त वाहिनीने म्हटले आहे. घडलेल्या घटनेनुसार, गावातील लाली कुमार नावाच्या तरुणाने बहिणीच्या प्रियकरावर आणि त्याच्या मित्रांवर सूड घेण्यासाठी दारूची पार्टी आयोजित केली होती. याच पार्टीदरम्यान लालीचे मित्र देखील उपस्थित होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक कुंदन कुमार यांच्या माहितीनुसार, आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक बोलावले. केवळ 48 तासांत या प्रकरणाचा पुढील छडा लावण्यात आला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पत्नीचा दीरावर जीव, प्रियकराला हाताशी धरत नवऱ्याचा काढला काटा
प्येयात विष मिसळून चौघांना संपवलं
पोलिसांनी मंगळवारी हे प्रकरण लक्षात घेत घटनेचा खुलासा केला होता. लाली कुमार आणि त्याचा मित्र रुदल कुमारला अटक करण्यात आली. या प्रकरणात सामील असलेल्या एका अल्पवयीन आरोपीला देखील पकडण्यात आले होते. तसेच आणखी एक आरोपी सन्नी कुमारचा देखील पोलीस तपास करत आहे. बेढना गावात 30 ऑगस्ट रोजी प्येयात विष मिसळून तेच प्येय गावातील निशु राज, शशि, विकास आणि पंकज यांनी प्राशन केले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तपासातून मुख्य आरोपी लालीने कबुली दिली की, त्यानेच दारू पार्टी आयोजित करत आपल्याच मित्रांकडून बाजारातून विष आणले आणि पाजले.
अडीच वर्षांपासून तरुणाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध
पोलिसांच्या तपासातून हे प्रकरण उघडकीस आले होते. नीशूचे अडीच वर्षांपासून लालीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. नीशूच्या कृत्यामुळे आणि बदनामीमुळे लाली खूपच अस्वस्थ होऊन गेली होती. मात्र, बाजारातून विष आणणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. त्याच्या शोधासाठी छापे देखील टाकण्यात आले होते. विष कोणत्याही दुकानातून खरेदी केले होते, याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील एका गावात विषारी प्येय पाजून डॉक्टरांनी विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण सांगत संशय व्यक्त केला. अशातच डॉक्टरांनी चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यांनी सांगितलं की, पार्टीसाठी पाणी किंवा दारूत विषारी पदार्थ मिसळला गेला असावा. त्यांनी सांगितलं की, दारू, अन्न आणि पाणी काहीही विषारी असण्याची अधिक शक्यता आहे. सर्वच लक्षणे विषबाधेचीच आहेत. भेसळयुक्त दारूमुळेच मृत्यू होईल असे नाही.
हे ही वाचा : सांगली : तोंडातून फेस..,आधी दाम्पत्य बेशुद्ध असल्याचं वाटलं, पण भयंकर खुलासा
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. अनेक संशयितांना ताब्यात घेत पुढील चौकशी केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ग्रामीण एसपींच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करत घटनास्थळी धाव घेत तपास केला.
ADVERTISEMENT












