सांगली : तोंडातून फेस..,आधी दाम्पत्य बेशुद्ध असल्याचं वाटलं, पण भयंकर खुलासा

मुंबई तक

02 Sep 2026 (अपडेटेड: 02 Sep 2026, 04:34 PM)

Sangli News : सांगली जिल्ह्यातील पलूस येथे मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवरा-बायकोने कौटुंबिक वादातून विषारी औषध पिऊन जीवन संपवलं.

Sangli News

Sangli News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सांगली जिल्ह्यातील पलूस येथे मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार

point

कौटुंबिक वादातून नवरा-बायकोनं संपवलं जीवन

Sangli News : स्वाती चिखलीकर - सांगली जिल्ह्यातील पलूस येथे मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवरा-बायकोने कौटुंबिक वादातून विषारी औषध पिऊन जीवन संपवलं. बाळासाहेब मुरलीधर (वय 58) आणि पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय 46) अशी मृतांची ओळख समोर आली. मंगळवारी दि: 1 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास उषा बाळासाहेब कदम यांचा सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शाहापूरमध्ये आश्रम शाळेतील 22 विद्यार्थिनींवर कर्मचाऱ्याकडून विनयभंग, आरोपीला अटक

कौटुंबिक वादातून नवरा-बायकोनं संपवलं जीवन

या प्रकरणी मुलगा अजय कदम यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी विषारी औषध प्राशन करत जीवन संपवल्याचा संशय आहे. या घटनेमागील खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. दरम्यान, मुलगा अजय कदम हा आई वडिलांपासून विभक्त होऊन कागल येथे राहत होता. बाळासाहेब कदम व पत्नी उषा हे दोघे पलूस येथे राहत होते. 

30 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. यानंतर पत्नी उषा यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर बाळासाहेब कदम यांनी पत्नीची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेत, 31 ऑगस्ट रोजी स्वत:ही विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्यांचा मुलगा अजय कदम यांच्या निदर्शनास आली. 

बाळासाहेब बेशुद्ध अवस्थेत अन् तोंडातून फेस

दरम्यान, बाळासाहेब बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे अजय यांना दिसून आले होते. त्यांना तात्काळ नातेवाईकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. दरम्यान, उषा कदम यांची प्रकृती अधिकच बिघडत चालल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

हे ही वाचा : “जर फाशी घेण्याची वेळ आली तरी…”, जरांगेंसोबतच्या चर्चेत जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाल्या?

एकाच घरात दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पतीचा घरात मृत्यू तर पत्नीचा रुग्णालयात झालेल्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस हवालदार रूपाली कुरणे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.