Crime News : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चरथावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकबरगड गावात एका तरुणाच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. 1 सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. तरुण शेताच्या दिशेने गवत कापण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार करण्यात आल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : शौचालयाची खिडकी तोडली अन्... हत्या, लूट, चोरीच्या अल्पवयीन आरोपींमुळे नागपूरमध्ये खळबळ
तरुणाला काहीतरी हुंगवलं अन् नंतर ब्लेडने हल्ला
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, तरुण शेताच्या दिशेने गवत कापण्यासाठी गेला असताना एका तृतीयपंथीयाने आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन व्यक्तींनी त्याला पकडल्याचा आरोप आहे. तरुणाला त्यांच्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यावरून वाद झाल्याचा दावा एका ग्रामस्थाने केला आहे. याचदरम्यान तरुणाला काहीतरी हुंगवण्यात आले आणि त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण काय होते, याची पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. घटनेनंतर परिसरात आरडाओरड झाल्याने आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तरुण रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचा दावा करण्यात आला.
हेही वाचा : नांदेडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, घटनेनं परिसर हादरला
घटनेची माहिती मिळताच चरथावल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी जखमी तरुणाला प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाशी बातचीत करून घटनेबाबत माहिती घेतली. तरुणाने ज्या व्यक्तींची नावे पोलिसांना सांगितली, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकारी सुनील कुमार यांनी सांगितले की, 1 सप्टेंबर रोजी अकबरगड येथील एका तरुणाच्या जखमी होण्याची माहिती चरथावल पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
जबरदस्तीने ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न?
या प्रकरणात अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. तरुणाला जबरदस्तीने एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झाला होता का, याच कारणातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला का? या घटनेत नेमके किती जण सहभागी होते आणि ब्लेडने हल्ला कोणी केला, याचा तपास पोलीस करत आहेत. ग्रामस्थ प्रदीप कुमार यांच्या म्हणण्यानुसार, जखमी तरुणाचे वय सुमारे 17 ते 18 वर्षे असून तो पशुपालनाशी संबंधित काम करतो. पोलिसांनी सध्या दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. जखमी तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सामान्य असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
ADVERTISEMENT












