नांदेडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, घटनेनं परिसर हादरला
Nanded Accident News : नांदेड शहरातील विष्णू नगर परिसरातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. एका भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाने विद्यार्थिनीला धडक दिली. या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नांदेड शहरातील विष्णू नगर परिसरात विद्यार्थिनीचा अपघात
मानसीच्या मृत्यूने विष्णू नगर परिसरात शोककळा
Nanded Accident News : कुवरचंद मंडले - नांदेड शहरातील विष्णू नगर परिसरातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. एका भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाने विद्यार्थिनीला धडक दिली. या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनीची मानसी जाधव (वय 21) अशी ओळख समोर आली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : चंद्रपूर: आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या अन्नात पडली पाल, 31 जणांना विषबाधा
LLB चे शिक्षण घेणाऱ्या मानसिचा अपघातात मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, नांदेड शहरातील विष्णू नगर परिसरात रोड क्र. 20 येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत विद्यार्थिनी मानसी ही नारायणराव चव्हाण या लॉ कॉलेजमध्ये LLB चे शिक्षण घेत होती. या अपघातात मानसी गंभीर जखमी झाली होती. मानसीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले असता, वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मानसीच्या मृत्यूने विष्णू नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
चार चाकी वाहन व स्कुटी पोलिसांनी घेतली ताब्यात
विशेष म्हणजे मानसी शिक्षण घेत असतानाच खाजगी नोकरी देखील करत होती. पोलिसांनी चार चाकी वाहन व दुचाकी ताब्यात घेतली असून प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा : मालाड येथे वाहनाची तीन ऑटो रिक्षासह बाईकला धडक, महिलेचा दुर्दैवी मृत्यू
मानसीच्या निधनानंतर तिच्या पाश्चात मानसीची आई, बहिण , एक भाऊ ,दोन काका आजी आजोबा, दोन काका असे तिचे कुटुंब आहे. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी मनसीचे वडिलांचे देखील दुःखद निधन झालं होत.
