चंद्रपूर: आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या अन्नात पडली पाल, 31 जणांना विषबाधा

मुंबई तक

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. अंबू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत दुपारी जेवणात पाल पडल्याची घटना समोर आली. तेच जेवण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. यामुळे आता विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे.

ADVERTISEMENT

chandrapur news
chandrapur news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थ्यांच्या अन्नात पडली पाल

point

विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल

Chandrapur News : विकास राजुरकर - चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. अंबू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत दुपारी जेवणात पाल पडल्याची घटना समोर आली. तेच जेवण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. यामुळे आता विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. विद्यार्थ्यांना पोटदुखी, चक्कर येत असल्याने एकूण 31 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनं ग्रामीण शाळेतील प्रशासनाविरोधात आक्रोश निर्माण झालाय. 

हे ही वाचा : मालाड येथे वाहनाची तीन ऑटो रिक्षासह बाईकला धडक, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

विद्यार्थ्यांच्या अन्नात पडली पाल

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याच्या नगराला येथे श्री अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळामध्ये मंगळवारी दुपारी 2:30 च्या सुमारास विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. दरम्यान आरोप असा की, जेवण बनवताना त्यात पाल पडल्याने तेच जेवण विद्यार्थ्यांना देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना उल्टी, पोटदुखी आणि चक्कर येऊ लागली होती. बघता विद्यार्थ्यांची तब्येत अधिक बिघडू लागली होती. हे पाहता शाळेच्या प्रशासनात मोठी खळबळ माजली होती. 

विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल

पीडित विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तिथे रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा नसल्याने त्यांना पुढे रेफर करण्यात आले होते. नंतर मुलांना राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

आश्रमशाळेच्या प्रशानाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. या घटनेनं आश्रमशाळेच्या प्रशानाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. अन्नात पाल पडून तेच अन्न विद्यार्थ्यांना दिल्याने पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.