Manoj Jarange Patil Health : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मध्यरात्री डॉक्टरांची धावपळ

मुंबई तक

Manoj Jarange Patil Health : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती खालावल्याचे वृत्त समोर आले आहे. मनोज जरांगे यांना उलटी आणि मळमळ त्रास सातत्याने जाणवू लागलाय. 

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil Health
Manoj Jarange Patil Health
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जरांगेंची प्रकृती खालावल्याचे वृत्त

point

वैद्यकीय पथकाने काय सांगितलं? 

Manoj Jarange Patil Health : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती खालावल्याचे वृत्त समोर आले आहे. मनोज जरांगे यांना उलटी आणि मळमळ त्रास सातत्याने जाणवू लागलाय. प्रकृती बिघडली असूनही त्यांनी वैद्यकीय उपचारास तसेच तपासणीस नकार दिला आहे. अशातच अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 

हे ही वाचा : माणुसकीला काळिमा! तीन महिन्यांच्या चिमुकलीचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर

वैद्यकीय पथकाने काय सांगितलं? 

मात्र, जरांगे यांनी उपचारास नकार दिल्याने पथकाला तापणसी न करताच परतावे लागेल. दरम्यान, 'काही वेळानंतर मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न करू,' असे वैद्यकीय पथकाने सांगितले होते. उपोषणास्थळी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणास्थळी भेट दिल्याची माहिती आहे. 

अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास 12 सप्टेंबरपर्यंत आंदोलन सुरूच ठेवून पुढील दिशा ठरवली जाईल असा त्यांनी इशारा दिला होता. दरम्यान, अद्यापही मराठा आरक्षणाबाबत अधिकृत शिष्टमंडळ चर्चेसाठी आलेले नाही. 

हे ही वाचा : Astrology : आज 1 सप्टेंबर, पहिल्याच दिवशी चार राशींना होणार मोठा फायदा

आरक्षणाच्या मागणीवर शिष्टमंडळ कधी चर्चा करणार? 

 

तसेच जिल्ह्याधिकाऱ्यांनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने जरांगेच्या प्रकृतीची दखल घेतली जात असल्याचे बोलले जातेय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांच्या मागणीवर शिष्टमंडळ कधी चर्चा करणार? मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय निर्णय घेतील? याकडे मराठा बांधव आणि आंदोलकांचे लक्ष लागलेले आहे.