मालाड येथे वाहनाची तीन ऑटो रिक्षासह बाईकला धडक, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

Mumbai Accident : मुंबईच्या मालाड येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. एका भरधाव वाहनाने कहर करत 3 ऑटो रिक्षा आणि एका वाहनाला जोराची धडक दिली. या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Mumbai accident
Mumbai accident
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या मालाड येथून मन सुन्न करून टाकणारा अपघात

point

भरधाव वाहनाने 3 ऑटो रिक्षा आणि एका वाहनाला जोराची दिली धडक

point

धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Accident : मुंबईच्या मालाड येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. एका भरधाव वाहनाने कहर करत 3 ऑटो रिक्षा आणि एका वाहनाला जोराची धडक दिली. या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना एस.व्ही. रोड आणि मामलेदार वाडी रोडच्या चौकात घडली. या घटनेनं मालाडचा परिसर हादरून गेला आहे. ज्या वाहनाने धडक दिली त्या वाहनाचा माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : माणुसकीला काळिमा! तीन महिन्यांच्या चिमुकलीचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर

भीषण अपघातात महिलेचा दुर्दैवी अंत 

घडलेल्या घटनेनुसार, 'एमजी विंडसर' (MG Windsor) कारने (नोंदणी क्रमांक MH 02 GJ 2722) आधी एका रिक्षाला आणि त्यानंतर दुचाकी व इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीस्वारासह एकूण सहा जण गंभीर जखली झालेत. या घटनेनंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी आरोपी चालक कृष्ण शांताराम चमनकर (वय 70) याला अटक केलीये. 

आरोपी चालकावर गुन्हा दाखल

आरोपी चालकाशी शताब्दी रुग्णालयात तपासणी करण्यात आली असता, या घटनेबाबत पोलिसांनी आरोपीवर मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(A)(B) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. 

हे ही वाचा : तू चिकनचे पिस का खाल्लेस? मित्रानेच मित्रावर चाकूने हल्ला करत संपवलं

अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. भरघाव वाहनाने झालेला भीषण अपघात नेमका कसा घडला होता? याचा पोलीस पुढील तपास करत आहेत.