पत्नीचा दीरावर जीव, प्रियकराला हाताशी धरत नवऱ्याचा काढला काटा
Crime News : पत्नीने आपल्या दीरासोबत मिळून अवैध प्रेमसंबंध आणि संपत्तीच्या वादातून पतीची हत्या केली. नंतर मृतदेह घरातील फासावर लटकवण्यात आला होता. पत्नीने पोलिसांना नवऱ्याने फास घेतल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीने दीरासोबत मिळून पतीला संपवलं
हत्या वाटावी म्हणून रचला कट
Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर परिसरात नातेसंबंधाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्या दीरासोबत मिळून अवैध प्रेमसंबंध आणि संपत्तीच्या वादातून पतीची हत्या केली. नंतर मृतदेह घरातील फासावर लटकवण्यात आला होता. पत्नीने पोलिसांना नवऱ्याने फास घेतल्याचं सांगितलं. तेव्हा पोलिसांनी मृतदे शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यानंतर या घटनेमागील खरी गंभीरता समोर आली. पत्नी आणि तिचा दीर यांच्यात अवैध प्रेमसंबंध आणि संपत्तीवरून पतीची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं.
हे ही वाचा : सांगली : तोंडातून फेस..,आधी दाम्पत्य बेशुद्ध असल्याचं वाटलं, पण भयंकर खुलासा
दीराच्या मदतीनं नवऱ्याला संपवून रचला डाव
घडलेल्या घटनेनुसार, 31 ऑगस्ट रोजी पतीच्या हत्येनंतर पोलिसांनी मोठा खुलासा केला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत सुमितची हत्या पत्नी काजलने आपल्या दीर उमेशसोबत मिळून केली होती. यानंतर हत्येला आत्महत्येचं स्वरूप देण्यात आलं. सुमितचा मृतदेह फासावर लटकवण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पत्नी काजल आणि दीर उमेशला अटक केली.
पत्नीचे दीरासोबत प्रेमसंबंध
या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली की, काजलचे आपला दीर उमेशसोबत कथतरित्या अवैध संबंध होते. दोघांनी मिळून पती सुमितला आपल्या नातेसंबंधातून हटवण्यासाठी आणि संपत्तीचा वाटा न देण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. काजल आणि सुमितचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनाही दोन वर्षांचे मुल आहे.
हे ही वाचा : शाहापूरमध्ये आश्रम शाळेतील 22 विद्यार्थिनींवर कर्मचाऱ्याकडून विनयभंग, आरोपीला अटक
या घटनेनंतर सुमितने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आरोप असाय की, या प्रकरणाला आत्महत्येचं स्वरुप देत प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जात होता. शवविच्छेदनाच्या अहवालातून खरं कारण समोर आलं. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर कारवाई करत अटक करण्यात आली आहे.
