Crime News : आपल्या पंजीच्या वयाच्या वृद्ध महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित वृद्ध महिलेचं वय हे 90 असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. गुरुवारी रात्री ती तिच्या गावातील शेतातील झोपडीत एकटी असताना ही भयानक घटना घडली होती. चौघांनी मास्क परिधान केलेले पुरुष घटनास्थळी आले आणि त्यांनी हे कृत्य केले. ही घटना मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यातील वारजेत पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध, विवाहितेचा वेगळ्या गोळ्या देऊन गर्भपात
आईला जिल्हा रुग्णालयात दाखल केले
घडलेल्या घटनेनुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्ध महिलेनं तिच्या मुलीला माहिती दिली होती. मुलीने तिच्या आईला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आला होता. डॉक्टरांचे म्हणणे असे की, हल्ल्यात महिलेला दुखापत झाली आहे, परंतु ती सध्या धोक्याबाहेर आहे.
सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरु केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पोलीस पथके तैनात करण्यात आली.
हे ही वाचा : 'तु मला आवडतेस', म्हणत जालन्यात सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले, नंतर खाली पाडून...
शिवाय, पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्याला 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस सध्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहेत आणि संशयितांची चौकशी करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी लवकरच छापे टाकतील असे पोलिसांचे म्हणणे आहे. संबंधित प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे.
ADVERTISEMENT











