लग्नसोहळ्यात गाण्याची फर्माईश करताच गोंधळ, नवरदेवाच्या काकासोबत भयंकर ...

Crime News : लग्नसोहळा सुरु असताना आवडीचं गाणं लावण्यावरून मोठा गोंधळ उडाला. गाणं न लवल्याने स्थानिकांनी वऱ्हाडी असल्याचे सांगत नवरदेवाच्या काकावर चाकूने हल्ला करत त्याची हत्या केली. या खळबळजनक घटनेनं गुरुवारी रात्री नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी आक्रोश व्यक्त केला. 

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:00 AM • 16 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑर्केस्ट्रा सुरू असताना गाण्याची फर्माइश आणि मोठा वाद

point

नवऱ्याच्या काकाला चाकूने भोसकलं

Crime News : बिहारच्या सीवान जिल्ह्यात लग्नसोहळा सुरु असताना आवडीचं गाणं लावण्यावरून मोठा गोंधळ उडाला. गाणं न लवल्याने स्थानिकांनी वऱ्हाडी असल्याचे सांगत नवरदेवाच्या काकावर चाकूने हल्ला करत त्याची हत्या केली. ही खळबळजनक घटना चैनपुर ओपी पोलीस ठाणे क्षेत्रातील नगई गावातील आहे. या घटनेनं गुरुवारी रात्री नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी आक्रोश केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : क्रूर बापाने 13 वर्षीय मुलाची गळा दाबून केली हत्या, मृतदेह तलावात दिला फेकून, धक्कादायक कारण समोर

ऑर्केस्ट्रा सुरू असताना गाण्याची फर्माइश आणि मोठा वाद

या प्रकरणातील मृत व्यक्तीची ओळख मनीष कुमार साह अशी झाली. घटनेनुसार, नंदलाल साहचा मुलगा सुशील कुमार याची वरात ही लक्ष्मीपुर देवपुर येथून नगई गावात रिशुन शाहच्या मुलीसोबत लग्नासाठी आली होती. अशातच सुशीलचा काका मनीषसोबत वरातीत आला होता. रात्री 12 वाजता ऑर्केस्ट्रा सुरू असताना गाण्याची फर्माईश केली, मात्र नागरिकांनी यावरून वाद घातला. 

नवऱ्याच्या काकाला चाकूने भोसकलं

त्याच परिस्थिती नागरिकांमध्ये मोठा गोंधळ झाला, मात्र परिस्थिती कशी बशी शांत करण्यात आली. काही लोक घटनास्थळावरून पळून गेले. पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास वऱ्हाडी मंडळी गाडीतून परताना, आरोपींनी मुलाचा काका मनीषला पकडले आणि चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

हे ही वाचा : पत्नी- दोन मुलींची हत्या, घरातील 9 फूट खोल खड्ड्यात मृतदेह पुरला, 'त्या' कारणातून नवऱ्याचा राग अनावर

संबंधित घटनेनं संतापलेल्या लोकांनी शुक्रवारी सकाळी चैनपूर बाजारातील आंबेडकर चौक अडवला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला समाजवून सांगितले. दरम्यान, मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला असून लेखी अर्ज दाखल करण्यात आला.