महिलांचे अर्तवस्त्र चोरायचा नाद, काकाने रंगेहात पकडताच भयंकर घडलं!

मुंबई तक

15 May 2026 (अपडेटेड: 15 May 2026, 06:54 PM)

Crime News : महिलांच्या कपड्यांची चोरी करताना पकडले गेल्याने पुतण्याने काकाची गळा आवळून हत्या केली असून, पोलिसांनी आरोपीला उदयपूरमधून अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलांचे अर्तवस्त्र चोरायचा नाद

point

काकाने रंगेहात पकडताच भयंकर घडलं!

Crime News : गुजरातच्या अहमदाबादमधील शिलज भागात एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. पैशांची आणि महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी करताना रंगेहाथ पकडले गेल्यामुळे एका पुतण्याने आपल्याच आत्याच्या पतीची गळा आवळून निर्घृण हत्या केली. आरोपी पुतण्याला महिलांचे कपडे घालण्याची आवड असून, त्याला चोरीचे व्यसन आणि एका विशिष्ट प्रकारचा मानसिक आजार असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : बॉयफ्रेंडच्या नादात खाल्ल्या घरचे वासे मोजले, करोडपतीच्या लेकीनं काय केलं?

अधिकची माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी शिलज येथील 'अवनीश हाईट्स'मध्ये राहणारे मनीषभाई हे त्यांच्याच फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले होते. मनीषभाई यांच्या मुलाने या घटनेची माहिती दिल्यानंतर बोपल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान मनीषभाई यांच्या मेव्हण्याचा मुलगा ब्रज सोनी हा बेपत्ता असल्याचे समोर आले, जो गेल्या 10 दिवसांपासून याच घरात राहत होता. फ्लॅटच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, ब्रज सोनी हा पहाटे पार्किंगमधून मनीषभाई यांची कार आणि एक बॅग घेऊन जाताना दिसला, तसेच घरातून 5 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : बॉयफ्रेंडच्या नादात खाल्ल्या घरचे वासे मोजले, करोडपतीच्या लेकीनं काय केलं?

अहमदाबाद ग्रामीणचे एसपी प्रकाश जाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपल पोलिसांनी एका पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी ब्रज सोनी याचा माग काढला. मनीषभाई यांची हत्या केल्यानंतर आरोपी त्यांचीच कार घेऊन राजस्थानच्या उदयपूरच्या दिशेने पळून गेला होता. पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून उदयपूर गाठले आणि तिथून आरोपी ब्रज सोनी याला बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी लुटलेल्या रकमेपैकी 2 लाख रुपयांची रोकड आणि घरातून चोरलेले महिलांचे अंडरगारमेंट्स हस्तगत केले आहेत. ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर लोकांकडून या विकृत मानसिकतेच्या गुन्ह्याबाबत तीव्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

चोरीची गुप्त माहिती पसरण्याच्या भीतीने रचला हत्येचा थरार

पोलीस चौकशीत या संपूर्ण हत्याकांडाचा अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. घटनेच्या दिवशी आरोपी ब्रज सोनी हा घरातून पैसे आणि आपल्या आत्याचे (मनीषभाई यांच्या पत्नीचे) अंडरगारमेंट्स चोरत होता. त्याच वेळी मनीषभाई यांनी त्याला रंगेहाथ पकडले. ही चोरीची बाब आणि आपली विकृत सवय सर्वांसमोर उघडी पडेल आणि सर्वत्र नाचक्की होईल, या भीतीने ब्रज सोनी याने मनीषभाई यांचा गळा आवळून त्यांना मृत्यूच्या दारात ढकलले. यापूर्वीही आरोपीने याच घरातून 25 हजार रुपयांची चोरी केली होती आणि त्यावेळी कुटुंबीयांनी त्याला पकडून मारहाणही केली होती, परंतु तरीही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नव्हती आणि अखेर या सवयीमुळे त्याने एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला.

आरोपीची अजब विकृती आणि पोलिसांनी केलेली कायदेशीर कारवाई

तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनाही हादरवून सोडणारी माहिती समोर आली आहे, ती म्हणजे आरोपीला महिलांचे कपडे परिधान करण्याचा छंद होता आणि ती गोष्ट घरातील सर्व सदस्यांना ठाऊक होती. चोरी करण्याच्या सवयीसोबतच त्याच्यात असलेल्या मानसिक विकाराने त्याला हा भीषण गुन्हा करण्यास प्रवृत्त केले. बोपल पोलिसांनी या प्रकरणी केवळ हत्येचाच नव्हे तर दरोड्याचाही गुन्हा दाखल केला असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, चोरी गेलेली उर्वरित रक्कम आणि गुन्ह्याशी संबंधित इतर तांत्रिक पुराव्यांची जमाजमाव करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.