Crime News : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. जिथे एका शाळेत जाणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीवर दुसऱ्या एका तरुणीने चाकूने हल्ला केला, नंतर ती घटनास्थळावरून पळाली. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एका मुलीवर दुसऱ्या तरुणीने चाकूने हल्ला केल्याने परिसर हादरून गेला आहे. ज्या मुलीवर हल्ला करण्यात आला त्या मुलीचं नाव अंजली (वय 15) असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'तू घर जावई आहेस...', मेहुण्याचा टोमणा दाजीच्या जिव्हारी; पुढं काय घडलं?
तरुणीने अंजलीवर चाकूने केला हल्ला
संबंधित प्रकरणातील पोलीस अधिकारी विनोद कुमार सिंह यांनी याबाबत सांगितलं की, सालारपूर गावातून जनसाथ येथील शाळेत बसने प्रवास करणाऱ्या इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अंजलीवर चाकूने हल्ला करत तिला जखमी केलं. पीडित मुलीनं सांगितलं की, ती एका प्रायवेट बसद्वारे शाळेत चालली असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
ज्या बसमध्ये ही घटना घडली, तिथेच तोंडाला ओढणी बांधलेली तरुणी तिथे उभी होती. पीडितेला काही तरी टोचत असल्याचा संशय आला, तेव्हा पीडितेनं तिला आपल्यापासून लांब राहा असं सांगितलं. त्याचदरम्यान तरुणी तिथून लांब गेली. काही वेळानंतर पीडित अंजली ही गाडीतून उतरू लागली असता, तिथेच तिच्यावर चाकूने हल्ला केला.
नंतर पुढे अंजलीनं सांगितलं की, शाळेत गेल्यानंतर तिला समजलं की, आपल्या पोटाच्या एका बाजूला चाकूने हल्ला केल्याचं जाणवलं. या घटनेच्या तक्रारीनंतर पीडितेला आरोग्य केंद्रात नेले होते. तिच्यावर तिथे उपचार देखील सुरु ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा : पुण्यात बॉम्ब ठेवणारा आरोपी सापडला, महाराष्ट्र ATS ने कुठून उचललं?
पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार सिंह यांनी सांगितलं की, विद्यार्थिनीने त्यांना सांगितलं की, तिच्या बाजूला चेहऱ्यावर कापड गुंडाळून उभ्या असलेला एका तरुणीने मुलीवर चाकूने हल्ला केला होता. या प्रकरणानंतर आरोपी तरुणीचा शोध घेणं सुरु आहे.
ADVERTISEMENT











