प्रेमसंबंधातून नवऱ्याने बायकोच्या प्रियकराचा कान चावून तोडला, दात तोडून जागेवर संपवलं

crime news : तरुणाने अनैतिक संबंधातून अपल्या पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. आपली क्रूरता दाखवत, आरोपीने पत्नीच्या प्रियकराचा दातांनी चावा घेत कान तोडला, नंतर दात तोडण्यात आले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने पुढे पोटात लाकडाने हल्ला करत हत्या केली.

Crime News

Crime News

मुंबई तक

15 May 2026 (अपडेटेड: 15 May 2026, 09:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या

point

नेमकं काय घडलं? 

Crime News : तरुणाने अनैतिक संबंधातून आपल्या पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. क्रूरतेचं टोक गाठत आरोपी नवऱ्याने पत्नीच्या प्रियकराचा दातांनी चावा घेत कान तोडला, नंतर दात तोडले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने पुढे प्रियकराच्या पोटात लाकडाने हल्ला केला. या प्रकरणात आरोपी पतीची ओळख अशोक मसीह अशी समोर आली आहे. महिलेच्या प्रियकराची डेव्हिड अशी ओळख समोर आली आहे. तसेच अशोकच्या पत्नीचे नाव रिंपी डेव्हिड असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : वडील बाहेर गेले, चुलत भावाला पोत्यात काहीतरी दिसलं, अन्... भयंकर कांड उघडकीस

नेमकं काय घडलं? 

पत्नी रिंपीने पोलिसांना सांगितलं की, रात्री उशिराने तिचा पती अशोक हा अमृतसरहून मोटारसायलवरून परतत होता. ती आणि तिचा मुलगा सॅम्युअल मसीह, त्यांच्यामागे येत होते. बोहाडू गावाकडून मडियालाच्या दिशेने प्रवास करताना, अशोक मसीह तसेच च्याचा मुलगा अभिषेक आणि इमॅन्युअल उर्फ मनी हे मागून मोटारसायकलवरून आले होते. 

आरोपीने मोटारसायकल थांबवून प्रेयसीच्या बॉयफ्रेंडला संपवलं 

आरोपीने तिच्या पतीची मोटारसायकल थांबवली आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. इतक्यातच आरोपीने तिच्या पतीवर अनेकदा वार केले, नंतर या हल्ल्यात तिच्या पतीला मार लागला होता. अमृतसरच्या सिव्हिल रूग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हे ही वाचा : साताऱ्याहून एकाच तासात पुण्याला पोहोचता येणार, मोठ्या प्रकल्पाची घोषणा

अशातच पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. मृत व्यक्ती डेव्हिड मसीहचे आरोपी अशोक मसीहच्या पत्नीशी अनैतिक प्रेमसंबंध होते. याचाच राग मनात धरून ही हत्या करण्यात आली होती.