साताऱ्याहून एकाच तासात पुण्याला पोहोचता येणार, मोठ्या प्रकल्पाची घोषणा

इम्तियाज मुजावर

Pune-Satara Highway : 'पुढच्या वर्षातच रस्त्यांचे चित्र बदलणार आहे, पुण्यातून अवघ्या आता एकाच तासांत साताऱ्यात पोहोचाल', असा मोठा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व्यक्त करताच उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या एकूण प्रोजेक्टची माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

pune satara highway
pune satara highway
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे-सातारा महामार्गाचे काम वेगाने सुरू

point

'पुढच्या वर्षातच रस्त्यांचे चित्र बदलणार'

पुण्याची गोष्ट : 'पुढच्या वर्षातच रस्त्यांचे चित्र बदलणार आहे, पुण्यातून अवघ्या एकाच तासांत साताऱ्यात पोहोचाल', असा मोठा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व्यक्त करताच उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. साताऱ्यातील झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी केवळ रस्त्याच्या विकासाची घोषणा केली नाही, तर राज्याच्या भविष्यासाठी वाहतूक क्रांतीचा आराखडा मांडला. 

हे ही वाचा : मुंबईची खबर : मध्य रेल्वेवर तीन दिवस विशेष ब्लॉक, नेमकं कारण काय? पहा बदललेले वेळापत्रक

'पुणे-सातारा महामार्गाचे काम वेगाने सुरू'

गडकरी म्हणाले की, पुणे-सातारा महामार्गाचे काम वेगाने सुरू असून या मार्गासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या सर्व्हिस रोड आणि फ्लायओव्हरच्या कामांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असून, पुढील सहा ते आठ महिन्यांत मार्गावर मोठा बदल निर्माण झाला होता. कागलपर्यंतचा रस्ता वेगवान आणि त्याचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नितीन गडकरींचं आश्वासन

'पुणे-सातारा महामार्गावर नेहमी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच अपघातांच्या संख्येत वाढ देखील झाली. अशातच त्यांनी नागरिकांना त्रास होत असल्याची जाणीव आहे, हा त्रास तात्पुरता असून पुढील दीड ते तीन वर्षांमधील चित्र संपूर्ण बदलेल', असे आश्वासन देण्यात आले. केवळ पुणे-सातारा नव्हेच तर राज्यातील अनेक महत्त्वाच्या भागात विकासकामे सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

हे ही वाचा : सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना फटकारलं, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

नवी मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाचा विस्तार हा बंगळुरूकडे जाणारा नवा एक्सप्रेस मार्ग आणि पुण्याभोवतीचा वेस्टर्न बायपासमुळे वाहतुकीचा वेग प्रचंड वाढणार असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई- बंगळुरू हा प्रवास केवळ पाच तासांवर आणण्याचे लक्ष असल्याचे त्यांनी केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा धोरणाची माहिती दिली. साताऱ्यातून संभाजीनगराकडे जाणाऱ्या प्रवाशांना लवकर पोहोचता येणार आहे. भविष्यात हा प्रवास अवघ्या तीन ते सव्वा तीन तासांत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. 
 

हे वाचलं का?