क्लायंटच्या फ्लॅटवर वाद, जिम ट्रेनरला बेदम मारहाण करत संपवलं

मुंबई तक

05 Oct 2026 (अपडेटेड: 05 Oct 2026, 06:13 PM)

Crime News : बंगळुरूत मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमृतहल्ली पोलीस ठाण्याने मृताच्या तीन सहकाऱ्यांसह एका क्लायंटला आणि चार जणांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Crime News (AI Photo)

Crime News (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

वैयक्तिक मुद्द्यावरून वादाचे मारहाणीत रुपांतर 

Crime News : बंगळुरूत मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमृतहल्ली पोलीस ठाण्याने मृताच्या तीन सहकाऱ्यांसह एका क्लायंटला आणि चार जणांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मृताची नंदन अशी ओळख समोर आली. तो सहकार नगरमधील जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोचा दुसऱ्याच पुरुषावर जीव, दारूचे आमिष दाखवून नवऱ्याला जंगलात पुरलं

नेमकं काय घडलं? 

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी जिमची वर्धापनदिनी पार्टी संपल्यानंतर, नंदन आणि त्याचे तीन सहकारी-विश्वनाथ, शरथ आणि निशांत रात्रभर मुक्कामासाठी क्लायंट अनुषच्या केम्पापुरा येथील फ्लॅटवर गेले होते. 

वैयक्तिक मुद्द्यावरून वादाचे मारहाणीत रुपांतर 

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चार जणांमध्ये एका वैयक्तिक मुद्द्यावरून वाद झाला आणि त्याचे मारहाणीत रुपांतर झाले. नंदनवर हल्ला आणि तो गंभीर जखमी झाला. या झटापटीत आरोपी विश्वनाथ आणि शरत हे देखील किरकोळ जखमी झाले. 

हे ही वाचा : विवाहबाह्य प्रकरणाबाबत बायकोनं नवऱ्याला विचारला जाब, पतीने धारदार शस्त्राने संपवलं

गंभीर जखमी झालेल्या नंदनला उपचारासाठी हेब्बल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पोलीस अधिकारी मिथुन कुमार यांनी सांगितलं की, अमृतहळ्ळी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, विश्वनाथ खरा, शरत आणि निशांत हे जिममध्ये नंदनचे सहकारी होते, तर अनुष हा त्याच जिमचा ग्राहक होता. विश्वानाथ अनुषचा वैयक्तिक प्रशिक्षक होता, असे पोलिसांनी सांगितलं. प्राथमिक तपासातून हा जून्या वादातून केलेली हत्या असल्याचा संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले.