Crime News : कर्नाटकातील सीमावर्ती जिल्हा चामराजनगर येथून धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार उघडकीस आला. एका हाउसिंग बोर्ड कॉलनीत एक अज्ञात मनोरुग्णाने केलेल्या कृत्याने परिसर हादरून गेला आहे. संबंधित व्यक्ती हा महिलांनी परिसरात वाळवत टाकलेले अंतर्वस्त्र चोरी करायचा आणि तेच अंतर्वस्त्र परिधान करून फिरायचा, व्यक्तीच्या अशा कृत्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड : पोलीस दलात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यानं मध्यरात्री संपवलं जीवन, घटनेनं परिसर हादरला
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, धक्कादायक प्रकार उघडकीस
मागील काही दिवसांमध्ये घराबाहेर महिला आपले अंतर्वस्त्र वाळवत टाकायच्या, त्यानंतर ते अंतर्वस्त्र अचानकपणे घटनास्थळावरून गायब व्हायचे. सुरुवातीला या प्रकरणाला फार साधारण प्रकरण समजलं गेलं. मात्र, असाच प्रकार सातत्याने होऊ लागला असता, लोकांना भलताच संशय निर्माण झाला. सत्य शोधण्यासाठी, रहिवाशांनी आपापल्या घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
महिलेचे अंतर्वस्त्र परिधान करुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर अश्लील कृत्य करतो
संबंधित प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रात्री उशिरा महिलेचा वेश धारण करून कॉलनीत आला होता. तो चतुराईने महिलांच्या घरासमोर वाळवत घातलेली अंतर्वस्त्रे चोरतो. एवढंच नाहीतर तो तशाच अवस्थेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर अश्लील कृत्य करताना दिसतो.
हे ही वाचा : Astrology : शनि देवाच्या उदयामुळे 'या' राशीचे भाग्य उजळण्याची शक्यता
या घटनेमुळे होऊसिंग बॉर्ड कॉलनीतील महिलांमध्ये मोठ्या प्रामाणावर चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. लोकांच्या मते, ही केवळ कपड्यांची चोरी नसून, सुरक्षेचं गंभीरपणे उल्लंघन करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपीला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली.
ADVERTISEMENT











