राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बड्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग, लॉजवरील अश्लील व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

28 Jun 2025 (अपडेटेड: 28 Jun 2025, 01:43 PM)

Crime News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरोधात 45 वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर सपाटेंनी दमदाटी केल्याचा महिलेनं आरोप केलाय.

Manohar Sapate Abuse Video

Manohar Sapate Abuse Video

Google CTA

बातम्या हायलाइट

point

45 वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

point

लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

Manohar Sapate Abuse Video : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरोधात 45 वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर सपाटेंनी दमदाटी केल्याचा महिलेनं आरोप केलाय. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असे का करता? असं म्हणत महिलेन यावर मनोहर सपाटेंनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि सांगितलं की, तुला कुठं तक्रार करायची ती कर मला काहीही फरक पडणार नाही, असे म्हणत थेट सपाटेंनी धमकीच दिली.

हे वाचलं का?

हेही वाचा : शिक्षकाने विद्यार्थीनीचे नग्न फोटो काढले, 15 दिवसांपासून जेवण सोडलं, गेली 10 महिन्यांपासून...

नेमकं काय घडलं? 

तक्रारदार महिला या मूळच्या सोलापूर तालुक्यातील आहे. गावातील शेतीच्या वादामुळे कोर्टात तिची केस सुरू आहे. त्यामुळे तारखेला महिलेला सोलापूरला यावं लागतं. सोलापूरला आल्यानंतर त्यांना वकिलाची भेट घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी मनोहर सपाटेंच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये सुरुवातीचे दोन दिवस रुम नंबर 202 तर पुढील दोन दिवस रूम नंबर 205 मध्ये त्यांनी वास्तव केलं. 

16 जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास मनोहर सपाटे यांनी पीडितेच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेशी अश्लील हावभाव करत विनयभंग केला. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात असं म्हणत प्रतिकार केला. त्यावर सपाटेनं कुठे तक्रार करायची ते कर, मला काहीही फरक पडणार नाही. माझं वय जास्त असल्यानं मला लगेचच जामिन मिळेल, अशा भाषेत मनोहर सपाटे यांनी धमदाटी केली. 

सपाटे यांनी याआधीही अनेकदा मोबाईवलवरुन संपर्क शरीर सुखाची मागणी केली होती. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पीडित महिला 24 रोजी रोजी अॅड. योगेश पवार यांचा सल्ला घेण्यासाठी सोलापूरमध्ये आल्या होत्या. तेव्हाच पीडितेला सपाटेंचा फोन आला आणि त्याने लॉजच्या खोली नंबर 307 मध्ये येणाचा आग्रह धरला. या संधीचा फायदा घेत महिलेनं शक्कल लढवत स्ट्रिंग ऑपरेशन केलं. 

हेही वाचा : अडीच वर्षाच्या मुलाला दाम्पत्यांकडून चटके आणि वेताचे फटके, कारण ऐकून थक्का व्हाल

24 जून रोजीच्या सायंकाळी पीडितेनं रुम नंबर 307 मध्ये जाऊन सपाटेच्या किळसवाणे व्हिडिओ काढले. त्या व्हिडिओत सपाटे हा पीडितेसोबत अश्लील कृत्य करताना दिसून आला. 25 जून रोजी मनोहर सपाटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.