प्रियकराने हात पकडले तर पत्नीने पाय.., पतीला गळा आवळून संपवलं, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

06 Oct 2026 (अपडेटेड: 06 Oct 2026, 12:47 PM)

Crime News : मेरठमध्ये राजमिस्त्री तालिबच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण हत्येत बदललं आहे. पत्नी इल्मा आणि तिचा कथित प्रियकर अमन यांच्यावर गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रियकराने हात पकडले तर पत्नीने पाय..,

point

पतीला गळा आवळून संपवलं, नेमकं काय घडलं?

Crime News : मेरठच्या फतल्लेहपूर परिसरातील 30 वर्षीय राजमिस्त्री तालिबच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण आता हत्येच्या आरोपापर्यंत पोहोचलं आहे. तालिबचा 28 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्याची पत्नी इल्माने तालिबचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं होतं. त्यानंतर नातेवाईकांनी तालिबचा मृतदेह मुजफ्फरनगर येथे नेऊन दफन केला. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वी काढलेल्या मृतदेहाच्या छायाचित्रांमध्ये गळ्यावर संशयास्पद खुणा दिसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. यानंतर तालिबच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : Mumbai Adivasi Student Protest | पोलिसांनी ताब्यात घेतलं? नेमकं काय घडलं?

स्कार्फने गळा आवळून पतीची हत्या? 

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह दफन करण्यापूर्वी इल्मा घरातील मौल्यवान वस्तू गोळा करताना दिसली होती. त्यानंतर परिसरातील काही लोकांनी इल्माचे ब्युटी स्टुडिओ चालवणाऱ्या अमनसोबत कथित संबंध असल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी तालिबचा मोबाइल मागितला असता तो हरवल्याचं इल्माने सांगितलं. मात्र, शोध घेतल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी कपड्यांमध्ये लपवलेला मोबाइल सापडला. मोबाइलमधील संभाषण, कॉल डिटेल आणि व्हॉइस रेकॉर्डिंगशी संबंधित माहिती तपासल्यानंतर कुटुंबीयांचा संशय आणखी बळावला. त्यानंतर त्यांनी तालिबचा गळा दुपट्ट्याने आवळून हत्या केल्याचा आरोप केला.

हेही वाचा : परभणी : कर्जाचा डोंगर, दुष्काळाचा फटका, कुटुंब रस्त्यावर आलं, मिरखेल गावात काय घडलं?

हत्या करुन मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न 

कुटुंबीयांनी पोलिसांना एक कथित व्हिडिओही दिला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, या व्हिडिओमध्ये इल्मा कथितरित्या संपूर्ण घटना सांगताना दिसत आहे. 28 सप्टेंबर रोजी तालिब घरी आल्यानंतर त्याचा इल्मासोबत वाद झाला. त्यानंतर इल्माने अमनला फोन करून घरी बोलावल्याचा आरोप आहे. अमन एका साथीदारासोबत घरी आला आणि तालिबसोबत मारहाण झाली, असा कुटुंबीयांचा दावा आहे. त्यानंतर अमनने तालिबचा दुपट्ट्याने गळा आवळला, त्याच्या साथीदाराने तालिबचे हात पकडले, तर इल्माने त्याचे पाय पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे तालिबचा मृत्यू झाल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तसेच घटना लपवण्यासाठी मृत्यू आत्महत्या किंवा नैसर्गिक असल्याचं सांगण्यास अमनने इल्माला सांगितल्याचा आरोप आहे.

तालिब आणि इल्माचं लग्न सुमारे चार वर्षांपूर्वी झालं होतं. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. इल्मा आणि अमन यांच्यात बऱ्याच काळापासून संबंध असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे, इल्माने कथित चौकशीत तालिब आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी लोहियानगर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे इल्मा आणि तिचा कथित प्रियकर अमन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालिबचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. शवविच्छेदनानंतरच तालिबच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.