साखरपुड्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण, 3 तरुणांकडून नको तेच..

मुंबई तक

• 03:30 PM • 16 Jun 2026

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साखरपुड्याच्या समारंभासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे तीन तरुणांनी जबरदस्तीने अपहण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासांतच 3 आरोपींना अटक करण्यात आली. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

3 तरुणांकडून पीडितेवर लैंगिक अत्याचार 

point

24 तासांतच 3 आरोपी अटकेत

Crime News : झारखंडच्या सिमदेगा जिल्ह्यातील कुदर्गे पोलीस ठाणे परिसरात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साखरपुड्याच्या समारंभासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे 3 तरुणांनी जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासांतच 3 आरोपींना अटक करण्यात आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 24 वर्षीय तरुणीला जंगलात नेलं, तोंडावर कापड टाकत चौघांनी..

पोलीस उपअधीक्षक रणवीस सिंग यांनी सांगितलं की, पीडित मुलगी ही मूळची छत्तीसगड जिल्ह्यातील होती. गेल्या 10 दिवसांपासून कुर्देग येथील तिच्या मावशीच्या घरी राहत होती. रविवारी 14 जून रोजी रात्री गावात आयोजित करण्यात आलेल्या एका साखरपुड्यात समारंभाला उपस्थित होती. 

3 तरुणांकडून पीडितेवर लैंगिक अत्याचार 

समारंभात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि गावातील विकी राम उर्फ विकी घनशी, निलेश बारला आणि देवदत्त डोम या 3 तरुणांनी याचा फायदा घेत तिला जबरदस्तीने पकडले. तिन्ही आरोपींनी पीडितेला नजीकच्या एका निर्जन घरात ओढत नेलं आणि पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. 

तरुणांच्या क्रूरतेनं भयभीत झालेली पीडित तरुणी छत्तीसगड येथील तिच्या घरी गेली. तिने आपल्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं. पीडितेनं दिलेल्या जबाबानुसार, स्थानिक पोलिसांनी तात्काळपणे झिरो एफआरआय नोंदवून सिमडेगा पोलिसांनी संपर्क साधला. 

हे ही वाचा : कल्याण: हुंडा न दिल्यानं सुनेचं मुंडन केलं, उकळतं पाणी टाकून..

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कुदर्गे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 70(2), 127(2), 96 कलमांन्वये पो़क्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विकी राम, निलेश बारला आणि देवदत्त डोम यांना अटक करण्यात आली.