मुलाने शेतात शौच केल्याने आईला रॉडने बेदम मारहाण, नंतर ग्रामस्थांकडून दगडफेक

मुंबई तक

• 05:08 PM • 30 May 2026

Crime News : लहान मुलाने शौच केल्याच्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला. पोलिसांच्या उपस्थितीनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करत दगडफेक केली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शेतात घाण पाहून तरुण संतापला

point

शौच केल्याच्या आरोपावरून महिलेवर रॉडने हल्ला 

Crime News : लहान मुलाने शौच केल्याच्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला. पोलिसांच्या उपस्थितीनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करत दगडफेक केली. पोलिसांच्या पथकाने आंदोलक आणि  उपस्थितांवर दगडफेक केली. पोलिसांनी पथकाने आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित प्रकरण भोरे पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे वृत्त आहे. ही घटना बिहारच्या गोपालगंज येथील आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : बहिणीसोबत मुलाचे प्रेमसंबंध, भावासह साथीदारांनी संपवलं; मृतदेह गटारात...

शेतात घाण पाहून तरुण संतापला

घटनेनुसार, मृत व्यक्तीची सुनील चौहान अशी ओळख पटली. पोलीस उशिरा घरी पोहोचल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी भोरे-मिरगंज मुख्य रस्ता अडवला आणि प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आतिश चौहान नावाच्या तरुणाची सुनील चौहान नावाच्या तरुणाच्या घरामागे एक शेती होती. सकाळी सुमारे साडेदहा वाजता तो शेतावर गेला असता, घाण पाहून तो संतापला. 

शौच केल्याच्या आरोपावरून महिलेवर रॉडने हल्ला 

त्याने सुनील चौहानच्या कुटुंबाने मुलांवर शौच केल्याचा आरोप करत गोंधळ सुरू केला. अशातच आतिश चौहानने सुमन देवीवर रॉडने हल्ला करत तिच्या डोक्यात प्राणघातक हल्ला केला. नंतर डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेय 

हे ही वाचा : बार्शी : खेळपट्टी सपाट करण्यासाठी रोलर फिरवू लागले, 14 वर्षीय मुलगा खाली पडला अन्...

गावकऱ्यांनी पळून जाणाऱ्या आरोपी आतिश चौहानला पकडून पोलिसांकडे दिले. प्रकरणाची माहिती देऊनही पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेतली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. संतप्त झालेल्या रहिवाशांनी रस्ता अडवून, आग लावली आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी गोपालगंज रुग्णालयात पाठवला.