धक्कादायक! सुनेनं सासूला टाईल्सनं ठेचून मारलं, कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. सुनेनं आपल्याच सासूला टाईल्सने ठेचून मारलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 

crime news

crime news

मुंबई तक

25 Jun 2025 (अपडेटेड: 25 Jun 2025, 08:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुनेनं सासूला टाईल्सने ठेचून मारलं

point

 मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अशीच एक घटना घडली

Crime News : आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही सासू आणि सुनेचा वाद आजही अनेकांच्या घरी बघायला मिळतो. पूर्वीची परिस्थिती ही वेगळी होती. सासू सुनेचा छळ करायची. सध्या काही अंशी परिस्थिती बदलली आहे. मात्र, सध्या सूनबाई सासूला जुमानत नाही उलट सूनबाईच सासूचा जाच करू लागली. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. सुनेनं आपल्याच सासूला टाईल्सने ठेचून मारलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुण्यात पोस्टरबाजी

गोमती चौधरी (वय 45) असे सासूचे नाव आहे. तर नेहा चौधरी असे सुनेचे नाव आहे. या दोघी विजयनगर पोलिस ठाणे परिसरातील श्रीरामनगरमध्ये राहत होते. नेहाने आपली सासू गोमतीला स्टाईल्सने मारहाण केली. तिचा पती घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याने पत्नीचा मृतदेह रक्ताने माखलेला पाहिला तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

सासू गोमाती आणि सून नेहा या दोघी घरात एकट्याच होत्या. गोमातीचा नवरा, मुलगा आणि मुलगी बाहेर गेले होते. नेहा फोनवर बोलत होती, त्यावर गोमतीने तिला अडवले. या प्रकरणावर वाद इतका वाढू लागला की, नेहाने गोमतीला बाथरूममध्ये बंद केलं आणि तिच्यावर अनेकवेळा टाईल्सच्या तुकड्यांनी हल्ला केला, यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : "माझा भाऊ डॉन, हाफ नाही तो डायरेक्ट फूल मर्ड....", दारूच्या नशेत पोरींचा भर रस्त्यात राडा

घटनेची माहिती पोलिसांना कळताच विजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नेहा चौधरीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नेहाची चौकशी केली आहे. दरम्यान, गोमतीचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. परिसरातील लोकांकडून लोक या प्रकरणाची माहिती जाणून घेत आहेत. 

    follow whatsapp