आईचं डोकं भिंतीवर आपटलं, नंतर रॉकेल टाकून पेटवलं...विवाहितेच्या प्रेमासाठी हैवान झाला पोटचा लेक

विष्णूचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. ती महिला आधीच एका मुलाची आई होती. ही गोष्ट विष्णूच्या आई जननी यांना अजिबात मान्य नव्हती. त्यांनी मुलाला अनेकदा समजावलं की, हे नातं योग्य नाही.

Mumbai Tak

मुंबई तक

25 Jun 2025 (अपडेटेड: 25 Jun 2025, 03:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेवर प्रेम, आई ठरत होती अडचण

point

आईने मुलाला दिली होती समज

point

संतापाच्या भरात मुलाने आईलाच संपवलं

तिरुअनंतपुरम : एका आईनं आपल्या मुलाला जन्म दिला, त्याला वाढवलं, शिकवलं-लिहायला शिकवलं... पण त्याच मुलाने एक दिवस तिची क्रूरपणे हत्या केली. ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही, तर केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील वक्कोम परिसरात घडलेली खरीखुरी घटना आहे. आरोपी मुलगा विष्णू याने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. आई त्याच्या “प्रेमाच्या” आड येत असल्यानं मुलानं हे कृत्य केलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> "माझा भाऊ डॉन, हाफ नाही तो डायरेक्ट फूल मर्ड....", दारूच्या नशेत पोरींचा भर रस्त्यात राडा

ही भयंकर घटना 22 एप्रिल 2023 च्या रात्री घडली.  या प्रकरणात आता आता न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने मुलाला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

आपल्याच आईचा खून, तरूण का बनला हैवान? 

विष्णूचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. ती महिला आधीच एका मुलाची आई होती. ही गोष्ट विष्णूच्या आई जननी यांना अजिबात मान्य नव्हती. त्यांनी मुलाला अनेकदा समजावलं की, हे नातं योग्य नाही. पण प्रेमात आंधळा झालेल्या विष्णूला आईच्या बोलण्याचा राग येऊ लागला.

हे ही वाचा >> "काढ व्हिडीओ, मी नाही घाबरत...", वकिलांशीही अरेरावी, ट्राफिक पोलीस कॉन्स्टेबलचा दुसरा व्हिडीओ
 

एका रात्री जेव्हा आईने पुन्हा या नात्यावर प्रश्न उपस्थित केले, तेव्हा विष्णूला संताप अनावर झाला. त्यावेळी त्याने आपल्या आईचं डोकं भिंतीवर आपटलं. यातही त्याचं समाधान झालं नाही. मग त्याने रॉकेल ओतून आईच्या जाळून टाकलं. आईला जाळल्यानंतर तो ओरडत बाहेर आला लोकांना आवाज देऊ लागला. अपघात घडला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या तरूणाने केला. पोलिस तपासात सत्य बाहेर आलं.

न्यायालयाचा निकाल: जन्मठेप आणि दंड

या खटल्याची सुनावणी तिरुअनंतपुरमच्या सहाव्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. रेखा यांच्या न्यायालयात झाली. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर न्यायालयाने विष्णूला दोषी ठरवलं. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. जर त्याने हा दंड भरला नाही, तर त्याला आणखी सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल.

    follow whatsapp