तरुणाचा मोबाइल वाजला, मेसेज पाहिला अन् हादरून गेला; 'त्याने' पाठवले होणाऱ्या पत्नीचे 'ते' Video आणि...

उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीचे लग्न मोडले. प्रेयसीच्या होणाऱ्या पतीला तिचे अश्लील फोटो पाठवून त्याने हे लग्न मोडलं.

प्रियकराने पतीला पाठवले होणाऱ्या पत्नीचे अश्लील फोटो (प्रातिनिधिक फोटो: Grok)

प्रियकराने पतीला पाठवले होणाऱ्या पत्नीचे अश्लील फोटो (प्रातिनिधिक फोटो: Grok)

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 09:53 PM)

follow google news

हल्द्वानी (उत्तराखंड): एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं दुसरीकडे ठरलेलं लग्न मोडण्यासाठी अत्यंत टोकाचं पाऊल उचल्याचं समोर आलं आहे. उत्तराखंडच्या हल्द्वानीमधील एका तरुणाने अत्यंत घृणास्पद कृत्य करत प्रेयसीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीचं दुसऱ्या तरूणासोबत लग्न होऊ नये यासाठी प्रियकराने प्रेयसीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या होणाऱ्या पतीला आणि तिच्या सासरकडील काही लोकांना पाठवले. त्यानंतर होणाऱ्या पतीने हे लग्न मोडलं. 

हे वाचलं का?

लग्नाच्या अवघ्या एक आठवडा आधी हा सर्व प्रकार घडला. आता पीडित मुलीने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.

हे ही वाचा>> पतीने शारीरिक संबंधासाठी पत्नीला थेट पाठवलं मित्राकडे, फक्त 'या' एका गोष्टासाठी...

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, मुखानी परिसरातील रहिवासी असलेल्या पीडित मुलीने सांगितले की, तिचे 6 जून रोजी खनस्यूं येथील ओखलकांडा येथील एका तरुणाशी लग्न होणार होते. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती.

होणाऱ्या पतीला आणि दिराला पाठवले तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ

तरुणीने असा आरोप केला आहे की, तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर मनोज सिंह चौधरीने लग्नाच्या सुमारे एक आठवडा आधी तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या होणाऱ्या पती आणि दिराला पाठवले होते. या घटनेनंतरच तिचे लग्न मोडले. मनोजने यापूर्वीही पीडितेचा बनावट आयडी तयार केला होता. त्यानंतर दोन नंबरवरून अश्लील फोटो आणि काही मेसेज व्हायरल केले होते.

हे ही वाचा>> पत्नीवर अनैतिक संबंधाचे आरोप, तरुणीसह दरीत उडी मारलेल्या तलाठ्याने शेवटच्या पत्रात उडवून दिली खळबळ

लग्नाच्या पत्रिकाही वाटलेल्या, पण..

प्रियकराने तरुणीचे अश्लील फोटो आधीही व्हायरल केले होते. त्यामुळे सप्टेंबर 2024 मध्ये आरोपी तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. पीडितेने सांगितले की, त्यानंतर त्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि पोलिसांना सांगितले होते की तो पुन्हा असे कृत्य करणार नाही. त्याने माफीही मागितली होती. परंतु आरोपीने पुन्हा एक अशाच स्वरूपाचं कृत्य करून प्रेयसीचं लग्न मोडलं. पीडितेने सांगितले की, तिच्या लग्नपत्रिका वाटण्यात आल्या. लग्नाचा हॉलही बुक करण्यात आला होता.

पीडिता पुढे म्हणाली, आरोपी तरुणाच्या या कृत्यामुळे तिच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. तिने तरुणावर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा आणि फसवणूक करून अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवल्याचा आरोप केला आहे. त्याच प्रकरणात, पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp