मध्यरात्री शौचालयास उठली मुलगी, सात जणांनी जंगलात केला अत्याचार

मुंबई तक

• 09:00 AM • 17 Jul 2026

Crime News : मामाच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सात जणांनी पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात सहा आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी लग्नसोहळ्यासाठी मामाच्या घरी आल्यानंतर हा लज्जास्पद प्रकार घडला. 

Crime News (AI Generated)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीडितेवर सात जणांनी केले लैंगिक अत्याचार 

point

सहा आरोपींना अटक

Crime News : ओडिशाच्या सुदरगढ जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. मामाच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सात जणांनी पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात सहा आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी लग्नसोहळ्यासाठी मामाच्या घरी आल्यानंतर हा लज्जास्पद प्रकार घडला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुरोगामी कोल्हापुरात सुनेचा छळ, बारशापूर्वी आईनं गळफास घेत संपवलं जीवन

पीडितेवर सात जणांनी केले लैंगिक अत्याचार 

घडलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. पीडिता रात्री शौचालयासाठी बाहेर आली होती. अशातच मोटारसायकवलवरून आलेल्या सात नराधमांनी संधी साधून पीडितेला जंगलात नेत लैंगिक अत्याचार केला होता. नंतर आरोपींना पीडितेला तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. 

सहा आरोपींना अटक

पीडितेनं धाडस दाखवून घटनास्थळावरून ती घरी परतली होती. तिने रडत रडत कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. ताब्यात आलेल्या आरोपींमध्ये एक  अल्पवयीन मुलगा होता. पोलीस या प्रकरणाचा सखोलपणे तपास करत आहे. 

हे ही वाचा : प्रेम विवाहाला आईचा विरोध, जावयाने सासूची कुऱ्हाडीने केली हत्या

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 137(2) आणि 70(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचा शोध सुरू असून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. पीडित मुलीला तत्काळपणे वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या उपचारानंतर पीडितेची प्रकृती स्थिर आहे.