Crime News : दिवसेंदिवस माणसातील क्रूरता वाढत चालल्याचं दिसून येत आहे. क्षुल्लक कारणावरुन मारहाण, हत्या केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून समोर आली आहे. एका नवऱ्याने दुपारच्या जेवणावरुन झालेल्या वादातून आपल्या 36 वर्षीय पत्नीची हत्या केली आहे. संतापाच्या भरात त्याने चाकूने वार करून बायकोला संपवले. संतोष कुमार ऊर्फ मूर्ती (40) असे आरोपी पतीचे नाव आहे. तो एका बिर्याणीच्या दुकानात काम करतो. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. केवळ दुपारचे जेवण आणले नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
सासूला फोन करुन काय सांगितलं?
कविता असे मृत महिलेचे नाव आहे. कविता ही दररोज आपल्या नवऱ्यासाठी त्याच्या कामाच्या ठिकाणी दुपारचे जेवण घेऊन जात असे. मात्र मंगळवारी (14 जुलै) ती दुपारचे जेवण घेऊन गेली नव्हती आणि तिने याबद्दल नवऱ्याला आधी कोणतीही माहिती दिली नव्हती. याच कारणावरून संतप्त झालेला संतोष कुमार संध्याकाळी घरी परतला आणि त्याने कवितासोबत जोरदार भांडण सुरू केले. संतापाच्या भरात संतोषने घरात असलेल्या नारळ खोवण्याच्या यंत्राने कवितावर हल्ला केला, ज्यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यानंतर संतोष घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याने काही वेळाने सासूला फोन करून आपण कवितावर हल्ला केल्याचे सांगून फोन कट केला.
हे ही वाचा : वर्धा : 12 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या, आई-वडील घरी नसताना काय घडलं?
'तू अजूनही जिवंत आहेस?'
घटनेची माहिती मिळताच कविताच्या आईने तातडीने तिच्या घरी धाव घेतली. तिथे कविता गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिला तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संतोषचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही. मंगळवारी उशिरा रात्री तो आपल्या पत्नीला पाहण्याच्या बहाण्याने त्याच खाजगी रुग्णालयात पोहोचला. पती आपल्याला भेटायला आला आहे असे कविताला वाटले, मात्र वॉर्डमध्ये प्रवेश करताच संतोष पुन्हा आक्रमक झाला. "तू अजूनही जिवंत आहेस का?" असे ओरडत त्याने आपल्याजवळ लपवून आणलेल्या धारदार चाकूने कवितावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला केला.
हे ही वाचा : प्रियकराच्या भावाने अमृताला संपवलं, चारी-बाजूंनी घात झाला, निष्पाप विद्यार्थीनीचा जीव गेला
पोटावर केले वार
संतोषने कविताच्या पोटावर एकामागून एक चाकूने अनेक वार केले. रुग्णालयाच्या आवारातच हा हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली, मात्र गंभीर जखमांमुळे कविताचा जागेवरच मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पती संतोष कुमार याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT












