Crime News : पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत एका खळबळजनक हत्याकांडाचा यशस्वी तपास केला आहे. एका जंगलात 11 जुलै रोजी एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा वाटत असला, तरी पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर ही आत्महत्या नसून एक पूर्वनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि त्याच्या लहान भावाला अटक केली असून, त्यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती समोर आल्याच्या भीतीतून ही हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
आईला वेगळाच संशय
मिळालेल्या माहितीनुसार, गोला कोरवा असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याचा मृतदेह जंगलात एका झाडाला गमछाच्या साहाय्याने लटकलेला मिळाला होता. गावात या मृत्यूची चर्चा आत्महत्या म्हणून सुरू असतानाच, गोलाच्या आईने यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. आपल्या मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांकडे निष्पक्ष तपासाची मागणी करणारे निवेदन दिले. आईच्या या संशयानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करण्यास आणि संशयितांची चौकशी करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : बंदी असताना महाराष्ट्रात गुटखा कसा काय मिळतो? तुकाराम मुंढेंनी थेट कारण सांगितलं..
वहिनीशी अनैतिक संबंध
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृताचा लहान भाऊ नारायण कोरवा याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान नारायणने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे त्याच्या मोठ्या भावाच्या पत्नीशी म्हणजेच सकलपतीया देवीशी अनैतिक संबंध होते. घटनेच्या दिवशी गोला कोरवाने त्या दोघांना जंगलात आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडले होते. या प्रकारामुळे समाजात आपली नाचक्की होईल या भीतीने दोघांनी मिळून गोलाचा काटा काढण्याचा कट रचला. त्यांनी आधी गोलाची हत्या केली आणि नंतर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा यासाठी त्याचा मृतदेह झाडाला लटकवून दिला.
हे ही वाचा : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर FDA ची मोठी कारवाई
पत्नीने केला गुन्हा मान्य
पोलिसांनी पुढे कारवाई करत मृताची पत्नी सकलपतीया देवी हिलाही अटक केली, तिनेही चौकशीत आपला गुन्हा मान्य केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती गढवाचे डीएसपी रोहित रंजन सिंह यांनी चिनिया पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, आईच्या सजगतेमुळे आणि पोलिसांनी केलेल्या तांत्रिक व वैज्ञानिक तपासामुळे या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा अवघ्या 48 तासांत खुलासा होऊ शकला. सध्या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
ADVERTISEMENT












