मित्रांच्या मदतीने बायकोची निर्घृण हत्या, दगडाचे ठेचला चेहरा, धक्कादायक कारण समोर

मुंबई तक

• 08:40 AM • 16 Jul 2026

बायको मुलाला माहेरी घेऊन गेल्याने नवऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने मित्रांसोबत मिळून एक कट रचला आणि सगळंच संपवलं. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मित्रांच्या मदतीने बायकोची निर्घृण हत्या

point

दगडाचे ठेचला चेहरा

point

धक्कादायक कारण समोर

Crime News : एका कौटुंबिक वादातून दुहेरी हत्येची एक थरारक घटना समोर आली आहे. विभक्त राहणारी पत्नी आपल्या पाच वर्षांच्या मुलाला माहेरी घेऊन गेल्याने संतप्त झालेल्या पतीने मित्रांच्या मदतीने पत्नी आणि तिच्या एका नातेवाईकाचे अपहरण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून दोघांचे चेहरे दगडाने ठेचून मृतदेह पुलाखाली फेकून दिले. या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

पुलाखाली आढळले मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा ठाकूर (25) आणि अरुण कुमार राणा (21) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. 10 जुलै रोजी खुंटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तजना नदीवरील पुलाखाली या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान संशयाच्या आधारे पोलिसांनी नेहाचा पती कुंदन प्रमाणिक याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.

हे ही वाचा : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर FDA ची मोठी कारवाई

अपहरण करुन निर्घृण हत्या

पोलीस चौकशीदरम्यान आरोपी कुंदनने आपला गुन्हा कबूल केला. त्याने आपले मित्र जितेंद्र सिंग आणि रितेश चिक बडाईक यांच्यासोबत मिळून ही हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी आधी नेहा आणि अरुण यांना रस्त्यात अडवले आणि जबरदस्तीने एका चारचाकी गाडीत बसवले. त्यानंतर धावत्या गाडीतच दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेहांचे चेहरे दगडाने छिन्नविछिन्न केले आणि पुलावरून खाली फेकून दिले.

हे ही वाचा : Maharashtra Weather : ये रे ये रे पावसा.., ऐन जुलै महिन्यात पाऊस गेला कुठे? 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

कुटुंबातील चौघांची साथ

या गुन्ह्यात कुंदनला मदत करणाऱ्या त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये कुंदनचा मोठा भाऊ मदन प्रमाणिक, बहीण सीता देवी आणि मेहुणा विजय रंजन शर्मा यांचा समावेश आहे. या तिघांनी गुन्ह्याची माहिती असूनही पोलिसांना कळवले नाही आणि पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान घटनेत वापरलेली चारचाकी गाडी, लोखंडी रॉड, मृत अरुणची मोटारसायकल आणि चार मोबाईल फोन जप्त केले असून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.