Wardha Crime, सुरेंद्र रामटेके : वर्धा शहरालगतच्या शिवारातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची अज्ञात नराधमाने दगडाने ठेचून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या पाशवी आणि क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून, स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या निष्पाप चिमुरडीला दगडाने ठेचून जागेवरच संपवण्यात आले.
ADVERTISEMENT
आई-वडील घरी आले अन्...
हा संपूर्ण काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार मृत मुलीचे आई-वडील रात्रीच्या सुमारास घरी परतले तेव्हा उघडकीस आला. दिवसभराच्या कामानंतर घरी आलेल्या पालकांना आपली पोटची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली. आपल्या निष्पाप गोळ्याची ही हृदयद्रावक अवस्था पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हेलावून गेला आहे.
हे ही वाचा : खरंच बुलेट ट्रेनसाठी बांधलेला उल्हास नदीवरील पूल कोसळला का? शासनाचे स्पष्टीकरण
कुणी केली हत्या?
या घटनेची माहिती मिळताच वर्धा पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. या निर्घृण हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे आणि आरोपीचा मुख्य हेतू काय होता, याचे गूढ अद्याप कायम आहे.
हे ही वाचा : नरेंद्र मोदींचा मूलांक किती? अंकशास्त्रज्ञांनी सांगितल्या खास गोष्टी
नेमका हेतू काय?
या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या क्रूर कृत्यामागे कोणाचा हात आहे? आरोपीचा नेमका हेतू काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी शोध पथके रवाना करण्यात आली असून संशयितांची चौकशी सुरू आहे. या नराधमाला पोलीस कधीपर्यंत बेड्या ठोकतात आणि या क्रूरतेमागचे सत्य कधी समोर येते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












