cardiologist dr mehul rathod suicide case : लातूर शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध एम.जे. हॉस्पिटलचे संचालक आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या चारचाकी वाहनात आढळून आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून डॉक्टरांच्या निधनाची बातमी समोर येताच नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी गुंगीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्रियकराच्या भावाने अमृताला संपवलं, चारी-बाजूंनी घात झाला, निष्पाप विद्यार्थीनीचा जीव गेला
कारमध्ये आढळला डॉ. मेहुल राठोड यांचा मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या महामार्गालगत त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मृतदेह आढळल्यानंतर संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. प्राथमिक तपासात गुंगीचे इंजेक्शन घेतल्यामुळे आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करत आहेत.
हेही वाचा : खरंच बुलेट ट्रेनसाठी बांधलेला उल्हास नदीवरील पूल कोसळला का? शासनाचे स्पष्टीकरण
डॉ. मेहुल राठोड हे लातूर शहरातील बार्शी रोड परिसरात असलेल्या एम.जे. हॉस्पिटलचे संचालक होते. ते हृदयरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते आणि अनेक रुग्णांवर उपचार करत होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून सर्व बाबींची सविस्तर चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
अमित देशमुख यांनी फेसबुक पोस्ट करत व्यक्त केली हळहळ
आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूर येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. मेहुल राठोड यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राठोड कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना, मी व माझे कुटुंबीय राठोड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून ओळख निर्माण झालेल्या लातूर शहरातील तरुण, होतकरू, सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या आकस्मित निधनामुळे या शहरातील आरोग्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माझी भावना आहे. डॉ. मेहुल राठोड यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो या प्रार्थनेसह त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली...!
ADVERTISEMENT












