Crime News : चंदीगड येथे मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मनजीत कौर प्रकरणात मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला ही सात आठवडे गर्भवती होती. 26 ऑगस्ट रोजी मनजीतने उपचारादरम्यान रुग्णालयात शेवटचा श्वास घेतल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वाढदिवसाचे आमिष दाखवून हॉटेलवर नेलं, लैंगिक शक्ती वाढवण्याचे औषध देत अत्याचार
मनजीतला झाडाला बांधून मारहाण करत दिलं पेटवून
पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्राथमिक तक्रारीनुसार, या घटनेला 3 जुलै रोजी सुरूवात झाली होती. आरोपींनी मनजीतला जबरजदस्तीने चंदीगडहून मोरिंदा येथे कारमधून नेले होते. तिथे त्याला कथितरित्या मारहाण करून एका झाडाला बांधून तिला जीवंत जाळून टाकल्याचं क्रूर कृत्य केल्याची घटना आहे.
या घटनेची माहिती मिळताच मनजीतचा एक मित्र घटनास्थळी दाखल झाला आणि त्याने ब्लँकेटनं पेटलेली आग विझवली होती. त्याने मनजीतला नजीकच्या एका रुग्णालयात दाखल केले होते. नंतर 9 जुलै रोजी चंदीगडच्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते.
महिनाभर व्हेंटिलेटरवर अन् 26 ऑगस्ट रोजी मृत्यू
जवळपास महिनाभर व्हेंटिलेटरवर आणि बर्न वॉर्डमध्ये राहिल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मनजीत कौर यांना थोड्या वेळासाठी शुद्ध आली. मात्र, शरीर भयंकर भाजले गेल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. जवळपास महिनाभर महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र 56 दिवसांचा लढा अखेर अयशस्वी ठरला असून 26 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. पोलिसांनुसार, मनजीत यांचा घटस्फोट झाला होता आणि त्यांना एक सात वर्षांचा मुलगा देखील होता.
हे ही वाचा : साडे तीन वर्षाच्या चिमुरड्याला खुर्चीला बांधून मारहाण, लैंगिक अत्याचाराचा आरोप
मनजीत कौर यांच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चंदीगड पोलिसांनी सुभी आणि पिंडा या दोन मुख्य संशयितांविरुद्ध अपहरण, खून आणि कट रचणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेपासून आऱोपी फरार झाला असून पोलीस त्यांच्या शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
ADVERTISEMENT












