तरुणाचं एकतर्फी प्रेम, पोलिसाच्या बहिणीवर रागाच्या भरात केला गोळीबार

मुंबई तक

• 04:28 PM • 04 Sep 2026

Crime News : एकतर्फी प्रेमातून आणि तरुणीने तरुणाला मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या प्रकरणातून संतप्त झालेल्या तरुणाने घरात घुसून पोलीस निरीक्षकाच्या बहिणीवर गावठी पिस्तुलाने गोळीबार केला होता.

Crime News (AI Photo)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीने पोलिसाच्या बहिणीवर तीन गोळ्या झाडल्या

point

गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी आरडाओरड

Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील टूंडला पोलीस ठाणे क्षेत्रात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकतर्फी प्रेमातून आणि तरुणीने तरुणाला मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या प्रकरणातून संतप्त झालेल्या तरुणाने घरात घुसून पोलीस निरीक्षकाच्या बहिणीवर गावठी पिस्तुलाने गोळीबार केला होता. आरोपी तरुण तिला सतत फोन करून त्रास देत होता. नंतर रागाने महिनेनं तरुणाला फोन नंबर ब्लॉक केल्याची माहिती समोर आली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर हादरलं! नवऱ्याने सोन्यासारख्या बायकोचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप, परिसर हादरला

आरोपीने पोलिसाच्या बहिणीवर तीन गोळ्या झाडल्या

या प्रकरणात संतापाच्या भरात आरोपीने दुसऱ्या मजल्यावर जाऊन महिलेवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळीबारात महिलेच्या खांद्याला गोळी लागली होती, तर इतर दोन गोळ्या या सोफ्याला लागल्याची माहिती समोर आली. या घटनेदरम्यान, ती महिला तिच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर मुलांना शिकवत होती. आरोपी अचानक आला आणि त्याने एका बेकायदेशीर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या होत्या. 

गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी आरडाओरड

गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली होती, आरोपीने या संधीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला होता. जखमी झालेल्या महिलेला तातडीने सरकारी ट्रॉमा सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर पीडितेवर उपचार सुरू ठेवण्यात आले होते. दरम्यान, पीडितेचा भाऊ हा युपी पोलिसातील उपनिरीक्षक असून सध्या तो कन्नोज येथे कार्यरत आहे. 

हे ही वाचा : किल्ल्यावर केक कापला, नंतर 3 चिमुकल्यांना खाली फेकलं अन् स्वत: मारली उडी, Gold मेडल Winner अश्विनीने का केलं असं?

या घटनेची माहिती मिळताच, टुंडलाचे पोलीस कॉन्स्टेबल अरुण कुमार चौरासिया आणि स्टेशन हाऊस ऑफिसर वैजनाथ सिंह हे पोलीस गावात दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.