Mumbai School Bus sexually assault Case : मुंबईत स्कूल बसमधून घरी जात असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी 30 वर्षीय चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एका खासगी बसवर चालक म्हणून काम करत होता. ही बस शाळेने विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी भाड्याने घेतली होती. बुधवारी दुपारी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडत असताना हा प्रकार घडला. घटनेच्या वेळी चिमुरडी बसमधील शेवटची विद्यार्थीनी होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रत्नागिरीहून आलेल्या बापटांनी पुणेकरांना शिकवू नये, ठोंबरेंची पोस्ट, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
बसमध्ये चालकासोबत एकटी राहिली, नराधमाने साधला डाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बालवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून घेऊन त्यांच्या घरी सोडण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ठिकाणी सोडल्यानंतर तीन वर्षांची चिमुरडी बसमध्ये चालकासोबत एकटी राहिली. याच परिस्थितीचा आरोपीने गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. त्याने बसमध्येच चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : भल्या मोठ्या कोयत्याने थेट माजी नगरसेवकावर सपासप वार अन् आरोपी सगळ्यांसमोरून निवांत गेला निघून!
"बसमधील ‘ड्रायव्हर अंकल’ने आपल्याला त्रास दिला"
चिमुरडी घरी पोहोचल्यानंतर तिने पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने आपल्या आजीला बसमधील ‘ड्रायव्हर अंकल’ने आपल्याला त्रास दिल्याचे सांगितले. चिमुरडीने दिलेल्या माहितीनंतर कुटुंबीयांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक केली. या घटनेमुळे चिमुरडीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.
आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत या प्रकरणात पुढील कारवाई सुरू केली आहे. तीन वर्षांची चिमुरडी घरी परतल्यानंतर तिने आजीला सांगितलेल्या माहितीतून हा प्रकार समोर आला आणि त्यानंतर कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. या प्रकरणात आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे.
ADVERTISEMENT












