जिमबाहेर प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या; स्कूटरवरून आलेले हल्लेखोर फरार

मुंबई तक

• 07:11 AM • 05 Sep 2026

delhi crime news : दिल्लीतील नरेला परिसरात जिमबाहेर प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोर स्कूटरवरून आले आणि अनेक गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले.

delhi crime news

delhi crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जिमबाहेर प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या

point

स्कूटरवरून आलेले हल्लेखोर फरार

Delhi Crime News : दिल्लीच्या नरेला परिसरात गुरुवारी सकाळी जिमबाहेर एका प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख प्रमोद दहिया अशी झाली असून, ते हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रहिवासी होते. सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रमोद दहिया जिमबाहेर असताना अज्ञात हल्लेखोर स्कूटरवरून घटनास्थळी आले.

हे वाचलं का?

हेही वाचा : किल्ल्यावर केक कापला, नंतर 3 चिमुकल्यांना खाली फेकलं अन् स्वत: मारली उडी, Gold मेडल Winner अश्विनीने का केलं असं?

खंडणीसाठी हत्या करण्यात आल्याची चर्चा 

हल्लेखोरांनी प्रमोद दहिया यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर स्कूटरवरून घटनास्थळावरून फरार झाले. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या खंडणीच्या प्रयत्नाशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.

हेही वाचा : नागपूर हादरलं! नवऱ्याने सोन्यासारख्या बायकोचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप, परिसर हादरला

 मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला

पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे. तसेच गोळीबाराची नेमकी घटना कशा प्रकारे घडली, याचा क्रम निश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रमोद दहिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातही जिमबाहेर अशाच प्रकारची घटना घडली होती. येथे हरभजन सिंह नावाच्या फायनान्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. व्यायाम करून ते जिमबाहेर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून फरार झाले. रुग्णालयात डॉक्टरांनी हरभजन सिंह यांना मृत घोषित केले. ही घटना पोलिस अधीक्षकांच्या अधिकृत निवासस्थानापासून काही अंतरावर घडली होती. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली होती. पोलीस अधीक्षक कमल दीप गोयल स्वतः घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणातही हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.