Gujarat Crime News : अहमदाबादमध्ये घराचा ताबा आणि भाड्याच्या पैशांवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून 25 वर्षीय अजित सिंह याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी हितेश सोलंकी हा यापूर्वीच एका खून प्रकरणात दोषी ठरून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एका तरुणाच्या हत्येचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात पोलिसांनी हितेश सोलंकी आणि त्याचा भाऊ रवी सोलंकी यांना अटक केली असून, अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दिरासोबत अनैतिक संबंध, संपत्तीचा हव्यासातून पतीची क्रूर हत्या, आत्महत्येचा बनाव
टेरेसवरून खाली फेकून केली हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, हितेश सोलंकी याला मितेश नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मितेश याला टेरेसवरून खाली फेकून त्याची हत्या केल्याप्रकरणी हितेशला दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात शिक्षा भोगत असताना हितेशला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला. त्यानंतर अहमदाबादमध्ये घराच्या ताब्यावरून आणि भाडे देण्यावरून सुरू असलेल्या वादात तो पुन्हा अडकला. याच वादातून अजित सिंहवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.]
हेही वाचा : सातारा : वॉशरुममध्ये अश्लील शब्द, पालकांना बोलवण्याची चर्चा अन् तरुणीची तिसऱ्या मजल्यावरुन उडी
तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, नेमकं काय घडलं?
ही घटना 31 ऑगस्टच्या रात्री घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, हितेश सोलंकी त्याचे भाऊ रवी सोलंकी, अक्षय सोलंकी आणि धर्मेश सोलंकी यांच्यासह तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन अजित सिंह राहत असलेल्या घरात पोहोचला. यावेळी त्यांनी सिंहवर हल्ला केला. या हल्ल्यात अजितच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हत्येनंतर हितेश आणि रवी यांनी अहमदाबादमधून पळून जाण्याची योजना आखली होती. मात्र, शहर सोडण्यापूर्वीच क्राइम ब्रँचने त्यांचा माग काढून दोघांना अटक केली. या प्रकरणातील अक्षय सोलंकी आणि धर्मेश सोलंकी हे दोघे अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके काम करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित सिंह राहत असलेल्या घराच्या ताब्यावरून आणि भाड्याच्या पैशांवरून बराच काळ वाद सुरू होता. याच वादाचे रूपांतर अखेर प्राणघातक हल्ल्यात झाले. हितेश सोलंकी याच्यावर यापूर्वीही खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT












