Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका महिलेने दीराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पत्नी आणि तिच्या दीराचे प्रेमसंबंध असल्याचा पोलिसांचा दावा असून, हे संबंध सुरू ठेवण्यासाठी तसेच संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी दोघांनी मिळून पतीची हत्या केल्याचा संशय आहे. हत्येनंतर मृतदेह फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना 31 ऑगस्ट रोजी खेतालपूर भैंसोली गावात घडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सातारा : वॉशरुममध्ये अश्लील शब्द, पालकांना बोलवण्याची चर्चा अन् तरुणीची तिसऱ्या मजल्यावरुन उडी
सुमितचा मृत्यू गळफासामुळे नव्हे, तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट
अधिकची माहिती अशी की, 35 वर्षीय सुमित याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती डायल 112 वरून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र, शवविच्छेदन अहवालात सुमितचा मृत्यू गळफासामुळे नव्हे, तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण नसून हत्या असल्याचा तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी सुमितची पत्नी काजल (30) आणि तिचा दीर उमेश (30) यांना अटक केली आहे.
हेही वाचा : डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज काढणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण, काय घडलं? VIDEO
मृत्यू आत्महत्येसारखा भासावा यासाठी मृतदेह लटकवला
तपासादरम्यान काजल आणि उमेश यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सुमितला ठार केल्यानंतर हे संबंध सुरू ठेवता येतील आणि त्याच्या संपत्तीवर ताबा मिळवता येईल, या हेतूने दोघांनी कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घरात अन्य कोणी नसताना काजल आणि उमेश यांनी सुमितचा गळा आवळला. त्यानंतर मृत्यू आत्महत्येसारखा भासावा यासाठी त्याचा मृतदेह घरात फासाला लटकवण्यात आला आणि सुमितने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली.
घटनेचा संशय आल्याने पोलिसांनी विविध पथके तयार करून तपास सुरू केला. संबंधित व्यक्तींचे स्वतंत्र जबाब नोंदवण्यात आले तसेच तांत्रिक आणि अन्य पुरावे गोळा करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे काजल आणि उमेश यांच्यावरील संशय आणखी बळावल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत दोघांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. सुमित आणि काजल यांचे सुमारे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना सुमारे दोन वर्षांचे एक मूल आहे. बुलंदशहर सिटीचे एसपी अभिषेक प्रताप यांनी शवविच्छेदन अहवालामुळे सुमितची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, कथित कट, हत्या आणि संपत्तीच्या कारणाचा अधिक तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुरावे न्यायालयासमोर सादर करून पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे.
ADVERTISEMENT












