Crime News : एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह ओयो हॉटेलमधील खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. मृत तरुणाचे नाव रजत प्रताप सिंग भाटी (वय 27) असे आहे. तो मेरठमधील रक्षा पुरम येथील येथील रहिवासी आहे. रजत प्रताप सिंग भाटी हा नोएडातील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : हॉटेलमध्ये तरूण-तरूणींचा सुरू होता वासनेचा खेळ, कंडोमची पाकिटं आणि व्हायग्रा.. रुममधील दृश्य पाहून पोलीस चक्रावले!
प्राथमिक तपासातून काय आलं समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत हा 2 नोव्हेंबर रोजी हॉटेलमध्ये राहिला होता. तेव्हा प्राथमिक तपासातून पोलिसांना खोलीतून मोबाईल फोन आणि दुरुची बाटली सापडली होती. तेव्हा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. दरम्यान, या प्रकरणात प्राथमिक तपासातून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या एकूण संपूर्ण प्रकरणात, मृताच्या कुटुंबाने आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि अपघाताचा संशय व्यक्त केला. कुटुंबाचे म्हणणे आहे की, आमचा मुलगा आत्महत्या करू शकत नाही, त्याला कोणीतरी असे कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे.
तरुणाला 1 लाख 25 हजार रुपये मासिक वेतन
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत हा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याला किमान 1 लाख 25 हजार रुपये मासिक पगार होता. गेल्या काही महिन्यांपासून तो त्याचा पगार घरी पाठवत नव्हता. कुटुंबाचा असा दावा आहे की, कोणीतरी त्याच्यावर आर्थिक किंवा मानसिक दबाव आणत असेल. तसेच या प्रकरणात एखाद दुसऱ्या मुलीचाही समावेश असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांनी पोलिसांकडून चौकशीची मागणी केली आहे.
हे ही वाचा : 'हा' आहे इंदूरीकर महाराजांचा होणारा जावई, नेमका काय आहे बिझनेस?
खोलीत गळफास घेत आत्महत्या
पोलिसांच्या मते 5 नोव्हेंबर रोजी पीआरबी 2157 द्वारे माहिती मिळाली की, एका व्यक्तीने शक्ती खंड-3 येथील मन मॉल हॉटेलच्या खोली क्रमांक 203 मध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, ते घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना बेडशीटला लटकलेल्या अवस्थेत एक तरुण आढळला. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











