"पती अनोळखी पुरुषांसोबत संबंध ठेवायला सांगायचा..." 4 मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली अन् कोर्टात भलतंच सांगितलं...

आता मनीषाने कोर्टात आपल्या प्रियकरासोबतच राहण्याची व्यक्त केली असून तिने तिच्या मुलांना तिच्यासोबत घेऊन जाण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

4 मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली अन्...

4 मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली अन्...

मुंबई तक

• 04:24 PM • 04 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

4 मुलांची आई मुलांना सोडून प्रियकरासोबत गेली पळून

point

"पती अनोळखी पुरुषांसोबत संबंध ठेवायला सांगायचा..." महिलेचे गंभीर आरोप

point

कोर्टात सांगितली वेगळीच कहाणी

Crime News: उत्तर प्रदेशातील एटी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे चार मुलांची आई आपल्या मुलांना सोडून घरातून अचानक फरार झाली. संबंधित महिलेचं नाव मनीषा असून तिच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर, पोलिसांनी मनीषाचा शोध घेतला आणि तिला बदायू जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं. पण, जेव्हा मनीषाला कोर्टात हजर केलं तेव्हा तिने वेगळीच कहाणी सांगितली. ती बांदा येथे तिचा प्रियकर मुकेश यादवसोबत राहत असल्याचं तिने सांगितलं. पती दारू पिऊन नेहमी शिवीगाळ करायचा आणि जुगार खेळत असल्याचा आरोपी मनीषाने केला. इतकेच नव्हे तर, ती म्हणातील ती तिचा पती रात्री अनोळखी लोकांना घरी बोलावायचा आणि त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. आता मनीषाने कोर्टात आपल्या प्रियकरासोबतच राहण्याची व्यक्त केली असून तिने तिच्या मुलांना तिच्यासोबत घेऊन जाण्यास नकार दिल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

पत्नीचे पतीवर गंभीर आरोप 

संबंधित घटना एटा जिल्ह्याच्या अलीगंज तहसील परिसरातील झकराई गावात घडल्याची माहिती समोर आली आहे. या गावातील रहिवासी भूपसिंग याचं मनीषा नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर या जोडप्याला चार मुलं झाली. पण एके दिवशी त्याची पत्नी अचानक घरातून बेपत्ता झाली. भूपसिंगने पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर मनीषा तिच्या प्रियकरासोबत बांदा येथे राहत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी घटनास्थळवरून संबंधित महिलेला अटक करून तिला न्यायालयात हजर केलं. मात्र, कोर्टात मनीषाने तिच्या पतीवर बरेच गंभीर आरोप केले. मनीषा म्हणाली की तिचा नवरा सतत दारू प्यायचा, जुगार खेळायचा आणि रात्री अनोळखी लोकांना घरी आणून पत्नीला त्यांच्यासोबत बळजबरीने लैंगिक संबंध ठेवण्यास सांगायचा. त्यामुळे, आता पतीसोबत राहायची इच्छा नसल्याचं महिलेनं सांगितलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय! आता मासिक पासधारकांना मिळणार 'ही' सवलत... काय होणार फायदा?

इंस्टाग्रामवरून तरुणासोबत झाली ओळख 

मनीषा पुढे म्हणाली, इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तिची बदायू जिल्ह्यात राहणाऱ्या मुकेश यादव नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर, दोघांच्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. एके दिवशी, संबंधित महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पण, पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि तिला बदायू येथून ताब्यात घेतलं.

हे ही वाचा: नालासोपाऱ्यात 'लिव्ह इन'मध्ये राहाणाऱ्या जोडप्याची चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

मनीषाला कोर्टात हजर केल्यानंतर तिने तिच्या प्रियकरासोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिच्या मुलांना तिच्यासोबत घेऊन जाण्यास तिने नकार दिला. मनीषा कोर्टातून बाहेर पडल्यानंतर तिची चार मुलं रडत होती आणि तिचे सासरे हंसराज सुनेला विनवणी करत होते. तरीही मनीषाने मागे वळून पाहिलं नाही. मनीषाचा पती भूपसिंग म्हणाला, "कोणीतरी माझ्या पत्नीला फसवलं आहे. मला चार लहान मुलं आहेत आणि आता आईशिवाय त्यांचं काय होईल?" मनीषाचे सासरे म्हणाले, "सून आणि तिच्या प्रियकराने आमचं घर उद्ध्वस्त केलं आहे. त्या दोघांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे."

    follow whatsapp