मुंबईची खबर: मुंबई मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय! आता मासिक पासधारकांना मिळणार 'ही' सवलत... काय होणार फायदा?
मुंबई मेट्रोकडून मासिक पासधारकांना विशेष सवलत देण्यात येणार असून यासंदर्भात, मुंबई मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय!
आता मासिक पासधारकांना मिळणार 'ही' सवलत...
मुंबई मेट्रोच्या 'या' निर्णयाचा काय होणार फायदा?
Mumbai News: मुंबईतील कफ परेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत भुयारी मेट्रो लाइन-3 च्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं असून यासाठी प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर, ही अंडरग्राउंड मेट्रो सुरू होऊन एक महिना सुद्धा पूर्ण झालेला नाही, तरी सुद्धा या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतंय. ही भूमिगत मेट्रो बऱ्याच लोकांसाठी फायदेशीर ठरल्याचं सांगितलं जात आहे. या मेट्रोमुळे प्रवास आरामदायी झाला असून प्रवाशांचा वेळही वाचत आहे. आता यासंदर्भात, मुंबई मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोच्या दिव्यांग (अपंगत्व असलेल्या) प्रवाशांना त्यांच्या मासिक मेट्रो पासवर 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. पुढील 10 दिवसांतच ही सवलत देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: Govt Job: 'नाबार्ड'मध्ये निघाली मोठ्या पदांवर भरती! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी अन्... कधीपासून कराल अर्ज?
मासिक पासवर 25 टक्के सूट
मेट्रोमध्ये अपंगांना सवलती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता, मेट्रो प्रशासनाकडून सवलतीची विनंती केल्यानंतर यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे. आता, भूमिगत मेट्रो प्रवाशांसाठी मासिक पासवर 25 टक्के सूट उपलब्ध असेल. तसेच, दिव्यांग प्रवाशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार ही सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे ही वाचा: लग्नापूर्वीच पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध... नंतर, करोडो रुपयांच्या हुंड्याची मागणी करत लग्नाला नकार!
किमान 50 टक्के सवलत...
ही मागणी करत पत्रात लिहिण्यात आलं आहे की, "महोदय, नम्र विनंती आहे की दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणारी सवलत त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार निश्चित करावी." मेट्रो 3 अद्याप पूर्णपणे सुलभ नसल्यामुळे, अपंग प्रवाशांना प्रवास करताना त्यांच्यासोबत एक व्यक्ती असणं आवश्यक असतं. त्यामुळे, अशा प्रवाशांसाठी किमान 50 टक्के सूट विचारात घ्या. मासिक पासवर सवलत देताना अपंग प्रवाशांच्या अपंगत्वाची टक्केवारी विचारात घ्या आणि फक्त UDID कार्डवरील अपंगत्वाच्या टक्केवारीवर आधारित सवलत द्या. ही सवलत किमान 50 टक्के असली पाहिजे. या निर्णयामुळे प्रवाशांना चांगलाच फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.










