Crime News: बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील 'एसकेएमसीएच'च्या एका वॉर्डमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या अल्पवयीन तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रकरणातील पीडिता गर्भवती राहिल्याने तिने रविवारी पंख्याला गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
रस्त्यावर भटकताना सापडली...
त्यावेळी, वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्ण आणि तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी पीडितेला पाहिलं आणि सुदैवाने तिचा जीव वाचला. पोलिसांना पीडित अल्पवयीन तरुणी ही रस्त्यावर भटकताना सापडली होती. त्यानंतर, तिला 13 ऑक्टोबर रोजी एसकेएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं. पीडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, पीडिता उत्तराखंडच्या उधमसिंग नगर जिल्ह्यातील रहिवासी असून ती 7 वीत शिकत असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा: पुणे: बाजीराव रोडवर मृत्यूचं तांडव, 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाची जागीच हत्या.. पुणेकर हादरले!
बरेच महिने शारीरिक संबंध अन् गर्भवती...
दरम्यान, तिच्या मोठ्या बहिणीच्या दीराने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला उत्तर प्रदेशातील बरेली येथे पळवून नेलं. तिथे, आरोपीने तरुणीसोबत बरेच महिने शारीरिक संबंध ठेवले आणि यामुळे ती गरोदर राहिली. त्यानंतर, आरोपी तरुणाने तिला दुसऱ्या ठिकाणी नेलं आणि पीडितेने विरोध केल्यानंतर तो तिला बलिया स्टेशनवर सोडून फरार झाला. त्याने, तरुणीचा मोबाईल सुद्धा हिसकावून घेतला. अल्पवयीन पीडितेने याबाबत सांगितलं की, बलियाहून ती कशीबशी ट्रेनने मुझफ्फरपूरला पोहोचली आणि इकडे तिकडे भटकत होती.
हे ही वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, 'कम्युनिष्ट' म्हणून हिणवलं त्याच भारतीय वंशाच्या ममदानी यांची न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवड
पोलिसांचा तपास
त्यानंतर, पोलिसांनी पीडितेला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर तिला एका रुग्णालयात नेण्यात आलं. एका महिला पोलीस अधिकाऱ्याकडून पीडितेची चौकशी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणासंदर्भात, एसकेएमसीएचचे उप-अधीक्षक डॉ. सतीश कुमार सिंह म्हणाले की, पोलिसांच्या देखरेखीखाली पीडित तरुणीवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. तसेच, अल्पवयीन तरुणीच्या कुटुंबियांचा शोध घेणं, हे पोलिसांचं काम आहे.
ADVERTISEMENT











