Bengalore Crime : बंगळुरु येथे डॉ. कृतिका एम. रेड्डी यांची हत्या त्यांचे पती डॉ. महेंद्र रेड्डी जीएस यांनी केली होती. या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला असे म्हटलं जात आहे. महेंद्रने पत्नीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी अनेक महिलांशी संपर्क साधला होता. धक्कादायक म्हणजे, त्यांनी त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता. पोलिसांनी सांगितलं की, व्यापारी के. मुनी रेड्डी (वय 60) यांनी जावई डॉ. महेंद्र जीएस (वय 31) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. महेंद्र यांनी त्यांच्या पत्नी डॉ. कृतिका एम. रेड्डी (वय 28) यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जी मुनी रेड्डी यांची धाकटी मुलगी ही 26 मे रोजी 2024 मध्ये बंगळुरुत महेंद्र रेड्डीसोबत विवाहबद्ध झाली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पैसे न दिल्याने सातवीत शिकणाऱ्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल, आई घरी येताच मृतदेह लटकलेला पाहून हंबरडा फोडला
महेंद्रने चार ते पाच महिलांना पाठवलेल्या मेसेजमध्ये नेमकं काय?
पोलिसांनी संबंधित प्रकरणात सांगितलं की, एका महिलेला कबूल केलं की, त्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात टाइम्स ऑफ इंडियानुसार वृत्तानुसार, महेंद्रने चार ते पाच महिलांना मेसेज पाठवले होते. संबंधित मेसेजमध्ये 'मी तुझ्यासाठी हत्या केली', असं लिहिलं होतं.
महत्त्वाची बाब म्हणजे, महिलेनं त्याला अनेक ठिकाणाहून ब्लॉक करून टाकलं होतं. हा मेसेज रेड्डी यांनी फोनपेअॅपवर मेसेज पाठवला होता. असे वृत्त आहे की महेंद्र दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या प्रयत्नात महिलांच्या संपर्कात आला होता. महेंद्रने 24 एप्रिल रोजी तिला भूल देऊन हत्या करण्यात आली. नंतर पोलिसांनी 14 ऑक्टोबर रोजी उड्डपी जिल्ह्यात अटक करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. जो चाचणीसाठी एका लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. तपासादरम्यान, त्याने महिलेला पाठवण्यात आलेले मेसेज उघड झाले. डीसीपी व्हाइटफील्ड म्हणाले की, महेंद्रने फोनपेद्वारे महिलेला मेसेज पाठवण्यात आला. महिलेला जबाब नोंदवण्यात आला आहे. तिने पोलिसांना सांगितलं की, तिने रेड्डीला त्याच्या लग्नापूर्वी ब्लॉक केले होते. कृतिकाशी विवाह केल्यानंतर तिने मेहंद्रपासून ती दूर जाऊ लागली होती. नंतर तिने सांगितलं की, गुन्ह्यात तिची कोणतीही भूमिका नाही.
महेंद्र 2023 पर्यंत मुंबईतील एका महिलेशी संपर्कात
दरम्यान, महेंद्रने मुंबईतील एका महिलेशी संपर्क साधला. अहवालानुसार, तपास अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, महेंद्र हा 2023 पर्यंत मुंबईतील एका महिलेशी संपर्कात होता. त्यानंतर दोघांमध्ये कसलाही संपर्क झाला नाही. त्यानंतर, सप्टेंबर महिन्यात महेंद्रने मुंबईतील महिलेशी बोलून तिला मृत नसल्याते सांगितलं.
हे ही वाचा : लातूर हादरलं! 9 वर्षाच्या चिमुकलीवर 50 वर्षीय वासनांध पुरुषाने खोलीत नेतं केलं लैंगिक शोषण, नंतर गुप्तांग दुखू लागल्यानं...
दरम्यान, महेंद्र रेड्डी हा डॉक्टर असून तक्रारदाराने आरोप केला की, लग्नानंतर महेंद्रने कृतिकाचा छळ करण्यास सुरुवात केली होती. महेंद्रने कृतिकाच्या कुटुंबावर रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. मुनी रेड्डी यांनी आरोप केला की, 21 एप्रिल रोजी महेंद्रने कृतिकाला घरीच तिला औषध दिले. त्यानंतर कृतिका बेशुद्धावस्थेत आढळून आली. मुनी रेड्डी यांनी आरोप केला की, कृतिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच मृत घोषित करण्यात आले.
ADVERTISEMENT











