Crime News : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मध्यमवयीन पुरुषाने पीडित तरुणीशी गोडीगुलाबीने बोलत, तिला स्कूटीवर बसवले आणि तिच्यासोबत वाईट कृत्य करण्यास सुरुवात केली, असा पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. पीडितेच्या बहिणीने सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष दिले नाही. या प्रकरणात पोलीस आरोपीलाच वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. ही घटना मानक पोलीस ठाणे अंतर्गत घडल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणेकरांना हक्काचं घर विकत घेणं होणार सोपं, 90 लाखांचं घर मिळणार 28 लाखात, असा करा अर्ज
मुलीचा शोध घेण्यास मुद्दमहून उशीर
पीडितेच्या कुटुंबाने या प्रकरणात पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास मुद्दमहून उशीर केला आहे. तरुणी रात्री 6 वाजता गायब झाली आणि मध्यरात्री 3.30 वाजता तिला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाच्या माहितीची सूचना कुटुंबियांना सकाळीच 11 वाजता देण्यात आली. पीडितेच्या बहिणीने सांगितलं की, तिच्या शरीरातून रक्त वाहत होते.
तरुणीला आमिष दाखवून गाडीवर बसण्यास जबरदस्ती
याच दरम्यान, तरुणी दुखापतीमुळे हैराण झाली होती. कुटुंबाने दावा केला की, आरोपीने तरुणीला बसण्यास जबरदस्ती केली. तब्बल चार ते पाच वेळा तिच्या अवतीभोवती फेऱ्या मारू लागला होता. त्यानंतर तरुणाने काही बाही आमिष दाखवून गाडीवर बसण्यास जबरदस्ती केली.
हे ही वाचा : असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले, भगतसिंग कोश्यारींचं नाव न घेता म्हणाले...
अशातच आता पीडितेच्या बहिणीने आरोप केला की, पोलीसच आरोपीला वाचवण्याचा कुठेतरी प्रयत्न करत आहे. संबंधित प्रकरणात एसीपी कँट यांनी सांगितलं की, गुन्हा दाखल करण्यात येत आहे. संबंधित प्रकरण हे 2 नोव्हेंबर रोजीचे आहे. कुटुंबाने बेपत्ता झालेल्या व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT











